मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, प्रवास करत असाल तर या वेळा लक्षात ठेवा!

मध्य रेल्वे, मुंबई विभाग आज म्हणजेच रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आज मुंबईकरांनी प्रवास करताना मेगाब्लॉगची वेळ लक्षात घेऊन प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, प्रवास करत असाल तर या वेळा लक्षात ठेवा!
Mumbai Local
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 7:10 AM

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आज म्हणजेच रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आज मुंबईकरांनी प्रवास करताना मेगाब्लॉगची वेळ लक्षात घेऊन प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि या सेवा विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.

ठाणे येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि या सेवा नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत.

हार्बर मार्गावर काय स्थिती?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल अणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्‍चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक्स आवश्यक आहेत. रेल्वे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

हे ही वाचा :

Varsha Gaikwad Compliant | वर्षा गायकवाड यांची सोनिया गांधींकडे तक्रार, थेट हायकमांडला पत्र लिहिल्यामुळे अचडणी वाढणार ?

Goa Elections 2022: राहुल गांधींचा गोवा दौरा; फुटबॉलला मारली किक! बघा व्हिडीओ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.