Mumbai Local Train Latest Update | लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे 

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे. (Mumbai Local Train Start Soon said CM Uddhav Thackeray)

Mumbai Local Train Latest Update | लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 7:06 PM

मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत होता. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे. मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (Mumbai Local Train Start Soon said CM Uddhav Thackeray)

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामन्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत.

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करावी अशी मागणी केली जात होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकलमध्ये काही ठराविक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत लोकलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान आज (25 जानेवारी) मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड,  बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह,  यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

यावेळी मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईकरांची लाईफलाईन सर्वांसाठी सुरु होणार असल्याचे बोललं जात आहे.  (Mumbai Local Train Start Soon said CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या :

‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान ‘ मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.