Mumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल ट्रेन अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहेत (Mumbai Local Train).
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल ट्रेन अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहेत (Mumbai Local Train). नुकतेच सहकारी आणि खाजगी बँक कर्मचाऱ्यांनाही लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांची लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला डब्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत उद्यापासून (28 सप्टेंबर) विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरारसाठी विशेष ट्रेन सुरु केली जाणार आहे (Mumbai Local Train).
विरार ते चर्चगेटसाठी सकाळी 7.35 ची लोकल रवाना होणार आहे. तर चर्चगेट ते विरारसाठी संध्याकाळी 6.10 वाजता दुसरी लोकल सुरु रवाना होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल ट्रेन चालवल्या जात होत्या. पण प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ट्रेनमध्ये गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंग पाळली जावी त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रवेश नसेल, असंही रेल्वेकडून पुन्हा सांगण्यात आलं आहे. त्यासोबत लोकलबाबत पसरल्या जाणाऱ्या अफवांबाबत कोणीही विश्वास ठेवू नये, असं आवानही रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
लस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता, WHO चा इशारा
राज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर