Maharashtra Lockdown | मुंबईत लॉकडाऊन करणार का? किशोरी पेडणेकर म्हणतात…

जर तुम्हाला लॉकडाऊन किंवा निर्बंध नको असतील तर नियमावली पाळावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.  (Mumbai Mayor on Corona Lockdown)

Maharashtra Lockdown | मुंबईत लॉकडाऊन करणार का? किशोरी पेडणेकर म्हणतात...
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 1:13 PM

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील वाढता कोरोना, लॉकडाऊन, निर्बंध यावर भाष्य केले. गेल्यावेळी मुंबईकरांच्या सहकार्याने कोरोना आटोक्यात आणणं शक्य झालं होतं. त्यामुळे आता तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona Lockdown)

जनतेने गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत 

लॉकडाऊन कोणालाच नको. पण निर्बंध घालून दिल्यानंतरही कोणीच पाळणार नसेल तर तुम्हीच नियम कसे द्यावे हे सांगा. रुग्णांची संख्या मृत्यूंचा आकडा वाढतो आहे. काहीच करणार नाही, असे होणार नाही. कारण सर्वांचा जीव लाखमोलाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने विचार करुन संयमी पावलं टाकत आहेत. तर मग त्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही

प्रत्येक समाजाच्या घटकाची मत जाणून घेतात. कोरोनाची लाट येत आहे. अर्धवट ती आली आहे. जर ती रोखायची असेल तर सर्वांनी सहकार्य करायला हवं. मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही. अजून सूचना आलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेवर भर देत आहोत.

कोरोनाचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. कारण नसताना घराबाहेर जाऊ नका. मास्क लावा, हे जर पाळलं तर येत्या दोन किंवा चार महिन्यात कोरोना रुग्ण कमी होईल. मुंबईकरांच्या सहकार्याने त्यावेळी कोरोना आटोक्यात आणणं शक्य झालं होतं. त्यामुळे आता तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्यात. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona Lockdown)

लॉकडाऊन नको असतील तर नियमावली पाळावी लागेल

पुण्यात मिनी लॉकडाऊन आहे. अनेक ठिकाणी मिनी लॉकडाऊन आहेत. त्यात धार्मिक स्थळं, हॉटेल्स, पब बंद केले आहे. बसच्या प्रवाशांच्या संख्येवर निर्बंध आणलेत. जर पुण्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत असेल तर त्याच धर्तीवर राज्यात अशाप्रकारे केले जाईल. जर तुम्हाला लॉकडाऊन किंवा निर्बंध नको असतील तर नियमावली पाळावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

पूर्वी लोक नियम पाळत होते. आता मात्र झुंबडच्या झुंबड दुकानात जात आहेत. अनेक जण बिनधास्त वावरत आहेत. हा बिनधास्तपणा तुमच्यासह इतरांच्या जीवावर बेतू शकतो. विषय अनेक आहेत पण आता ही वेळ नाही. आताची वेळ स्वत:चा जीव वाचवण्याची आहे. त्यावर आपण भर दिला पाहिजे, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी विरोधकांना लगावला.

महापालिकेत व्हेंटीलेटरची कमतरता नाही

मुंबईत 4600 लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आहे. सध्या बेड राखीव आहेत. नागरिकांना आवडीचं रुग्णालय हवं असतं, मात्र यामध्ये वेळ जातो, यामुळे त्रास होतो. त्यामुळे रुग्णांनी हा बेड किंवा ते रुग्णालय याची आशा धरु नका. जो बेड किंवा रुग्णालय मिळेल तिथे उपचार घेणे सुरु करावेत. महापालिकेत व्हेंटीलेटरची कमतरता अजिबात नाही, असेही त्या म्हणाल्या.  (Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona Lockdown)

संबंधित बातम्या : 

Lockdowon: लोक बेफिकीर; भाजपच्या नेत्यांना लोकांच्या जीवाशी देणघेणं नाही; नवाब मलिकांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.