भाजप नेत्यांकडून मदती ऐवजी फक्त बेताल वक्तव्ये; किशोरी पेडणेकर बरसल्या

भाजप त्यासाठी कोणतीही मदत न करता फक्त राजकारण करत आहे. कोणतीही मदत न करता फक्त विरोध करायचा ही भाजपच्या काही नेत्यांची भूमिका आहे," अशी घणाघाती किशोरी पेडणेकर यांनी केली. (kishori pednekar bjp corona lockdown)

भाजप नेत्यांकडून मदती ऐवजी फक्त बेताल वक्तव्ये; किशोरी पेडणेकर बरसल्या
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 5:12 PM

मुंबई : “राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सध्या केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील भाजप नेते त्यासाठी कोणतीही मदत न करता फक्त राजकारण करत आहेत. कोणतीही मदत न करता फक्त विरोध करायचा ही भाजपच्या काही नेत्यांची भूमिका आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( mayor Kishori Pednekar) यांनी केली. राज्यात कोरोनाच प्रसार वाढतो आहे. त्या मुंबईमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. (Mumbai mayor Kishori Pednekar criticizes BJP over Corona patient and lockdown)

भाजपकडून फक्त राजकारण

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत तर परिस्थिती आणखी चिंतानतक आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊन हा कोरोनाला थोपवण्याचा एकच पर्याय नसून बाकी इतर गोष्टींनीसुद्धा कोरोना संसर्ग कमी करता येतो, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना “अनेक निर्बंध घालूनही लोक एकत नसतील तर कडक लॉकडॉऊनच्या दिशेनं जावं लागेल, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पण काही लोक त्याचं राजकारण करत आहेत. काही भाजप नेतेमंडळींनी कोरोनाच्या काळात मुंबईतच उपचार घेतले आहेत. त्यांनी लसीकरणाचा फायदाही घेतलाय. सध्या केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणणे गरजेचे आहे. मात्र, कुठलीही मदत नकरता फक्त विरोध करायचा आणि नुसतं राजकारण करायचं एवढंच भाजपचे नेते करत आहेत,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नाही

तसेच पुढे बोलताना भाजपचे काही नेते बेताल वक्तव्य करतात असे म्हणत त्यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलंय. कोरोनाकाळात मुंबई महापालिकेने कोरोनाग्रस्तांसाठी बेड आणि लसीकरणासाठी प्रयत्न केला. पालिकेने बेड आणि लस जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नाही. दुसरीकडे भापज नेते राजकरण करत आहेत. ते हिंदूंच्या सणांबद्दल बोलत आहेत. लॉकडाउनला विरोध करणार असे म्हणत, ते बेताल वक्तव्य करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रण तोकडी पडते की काय?, असी चिंता सरकारला लागली आहे. मुंबईत तर कोरोनाची संख्या अधिक चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रसार थांबावा म्हणून राज्य सरकारने 28 मार्चपासून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे सूचक वक्तव्यही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. त्यांनतर भापजने लॉकडाऊनला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

LIVE | पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर, भगीरथ भालके यांना उमेदवारी

Corona Cases and Lockdown News LIVE : बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्या, धनंजय मुंडे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

(Mumbai mayor Kishori Pednekar criticizes BJP over Corona patient and lockdown)

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.