AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महपौर म्हणतात आता तरी बोध घ्या, भाजप म्हणतं अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका, कोर्टाच्या कौतुकाने शिवसेना-भाजप आमनेसामने

सेना-भाजप नेते ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन एकमेकांवर रोखठोक टीका करत आहेत. (kishori pednekar corona vaccination oxygen supply)

महपौर म्हणतात आता तरी बोध घ्या, भाजप म्हणतं अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका, कोर्टाच्या कौतुकाने शिवसेना-भाजप आमनेसामने
KISHORI PEDNEKAR AND PRAVIN DAREKAR
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 5:07 PM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen supply) भासत आहे. मुंबई प्रशासनाने मात्र ही स्थिती मोठ्या हिमतीने हाताळली. मुंबईच्या नियोजनाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा केले. सोबतच केंद्र सरकारला मुंबई पॅटर्न समजून घेण्याची आदेशवजा सूचनासुद्धा केली. मात्र, याच कारणामुळे आता राज्यातील शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सेना-भाजप नेते ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन एकमेकांवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका असे म्हणत मुंबईत अजूनही बेड मिळत नाहीत. लसीकरणाचा गोंधळ आहे, असा आरोप केला. तर कोर्टाने केंद्राची कानऊघडणी केली आहे. त्यांनी आतातरी बोध घ्यावा असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे चिमटे काढले आहेत. (Mumbai Mayor Kishori Pednekar criticizes BJP over protest Corona vaccination and Oxygen supply)

भाजपचे लोक अभ्यास करत नाहीत, आतातरी बोध घ्या

मुंबईत भाजप नगरसेवकांनी 5 मे रोजी आंदोलन केले. त्यांनी लस तुटवडा तसेच इतर कोरोनाविषयक सुविधांची वानवा असल्याचा आरोप केला. तसेच मुंबई मनपा कोरोनाविरोधात नियोजन करण्यासाठी संपूर्णपणे फोल ठरले आहे, अशी टीकासुद्धा केली. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी भाजपचे नगरसेवक आंदोलन करणार आहेत हे मला माहिती असते, तर मोफत लसीसाठी मी स्वत: सहभागी झाली असते, अशा शब्दात चिमटा काढला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची कानउघडणी केली आहे. मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. दिल्लीला होत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. त्याचा बोध आतातरी संबंधितांनी घ्यावा,  असेदेखील पेडणेकर म्हणाल्या.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका

तर कोर्टाने मुंबई महापालिकेचे कौतुक केल्यानंतर प्रविण दरेकर यांनीसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली होती . त्यांनी “कोर्टाने कौतुक केलं ही चांगली बाब आहे. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. मुंबईत आज बेड मिळत नाहीत. लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. याकडे लक्ष द्यायला हवं, अशा खोचक शब्दात मनापाला सल्ला दिला होता.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ?

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत केंद्र सरकारने मुंबई प्रशासनाकडून माहिती घ्यावी. त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा कसा व्यवस्थित ठेवला हे पाहावे. त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेता येतात का तेही पाहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.

दरम्यान, कोर्टाच्या याच वक्तव्यानंतर राज्यात मोठं राजकारण रंगलं आहे. शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत.

इतर बातम्या :

लय भारी! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिव्हीरच्या उत्पादनाचा परवाना

Maharashtra Oxygen Shortage : कर्नाटक सरकारने सांगली, कोल्हापूरचा ऑक्सिजन रोखला!, केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी

महाराष्ट्राची लसीकरणात आघाडी कायम, लसीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक

(Mumbai Mayor Kishori Pednekar criticizes BJP over protest Corona vaccination and Oxygen supply)

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.