AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार, महापौर किशोर पेडणेकर म्हणतात…

मुंबईत लोकल ट्रेन नेमक्या कधी सुरू होणार याचं उत्तर महापालिका देऊ शकत नाही. | Mumbai Local Train

मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार, महापौर किशोर पेडणेकर म्हणतात...
लोकल ट्रेन
| Updated on: Jun 01, 2021 | 3:05 PM
Share

मुंबई: मुंबईतील कोरोना रुग्णंसख्या आटोक्यात आल्यामुळे आता शहरातील निर्बंध हटवण्याचा प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार आजपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने जास्त वेळ खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यापेक्षा मुंबईकरांच्यादृष्टीने महत्वाची असलेली लोकल सेवा (Mumbai Local Train) कधी सुरु होणार, या प्रश्नाचे उत्तर अनेकांना हवे आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Mumbai Local train service)

यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असता तुर्तास त्याबाबत काही सांगता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्या मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. मुंबईत लोकल ट्रेन नेमक्या कधी सुरू होणार याचं उत्तर महापालिका देऊ शकत नाही. राज्य सरकार त्याचं उत्तर देईल आणि त्यावर निश्चितच विचार केला जात असेल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

मात्र, गेल्यावेळच्या लॉकडाऊननंतर शिथीलता देण्यात आली तेव्हा बरेचसे लोक विनामास्क प्रवास करत होते. आज जरी आपल्यापैकी अनेकांनी लस घेतली असली तरी मास्क लावणं हे बंधनकारक व महत्त्वाचं आहे. पण एकदा लोकल सुरू झाली की त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. मागील वेळीही तसं झालं होतं. मोठ्या संख्येनं लोक विनामास्क ये-जा करत होते. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर झाला होता. त्यामुळं लोकल ट्रेनसाठी आपल्याला आणखी काही दिवस थांबावं लागेल, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

‘कोरोनाकाळात मुंबईत शिवसेनेने चांगलं काम केलंय, निवडणूक हरण्याचा प्रश्नच येत नाही’

कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने मुंबईत चांगल्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. या काळात आपल्याला कोणी वाचवलं आणि कोण आपल्याला संकटात घालत आहे, हे मुंबईकर पाहतच आहेत, असे पेडणेकर यांनी म्हटले.

शिवसेना मुंबईत प्रत्येक स्तरावर काम करत आहे, हीच भाजपची पोटदुखी आहे. त्यामुळे भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, जीवन-मरणाचा प्रश्न होता तेव्हा आपल्यासोबत कोण होते, हे नागरिकांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांना आरोप करत राहू दे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

संबंधित बातम्या  

मुंबई महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, आशिष शेलारांचा आरोप

BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश

मुदतपूर्व निवडणूक ते 30 वॉर्ड फोडण्याचे प्रयत्न, शिवसेनेचं कारस्थान, आशिष शेलारांचे 4 मोठे आरोप

(Mumbai Mayor Kishori Pednekar on Mumbai Local train service)

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.