किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर दिशाची बदनामी थांबण्यासाठी महिला आयोगाने उतरावं-किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपची आघाडी बदनामी कडे वळतेय, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात चाललेल्या पॉलिटीकल वॉरमुळे राजकारणातली धग सध्या वाढलीय. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही बाजुने वार सुरू आहेत. त्यातच काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा बॉम्ब फोडला. दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्याबद्दल ट्विट करत राणेंनी मातोश्रीतील काही जणांसाठी ईडीच्या नोटीसा तयार असल्याचे ट्विट केले. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपची आघाडी बदनामी कडे वळतेय, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. तीन पैशांचा तमाशा किरीट सोमेयांच्या माध्यमातून मुंबईत होतोय. त्यांनी दिशा सलीयन बद्दल काढलेले उदगार व्यथित करणारे आहेत. तिच्या रिपोर्टला खोटं ठरवण्याचं काम ते करत आहेत, असाआरोप महापौरांनी केला आहे.
महिला आयोगाने याची दखल घ्यावी
भाजपच्या आरोपांमुळे दिशाच्या चारित्र्याचं हणन होत आहे.महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विनंती आहे की यावर कारवाई करा.भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनाही सांगेन महिला म्हणून यात लक्ष घाला. मृत्यूनंतर ही बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही, अशी घणाघाती टीका मुंबईच्या महापौरांनी केली आहे. तसेच अन्वय नाईक याचे कुटुंबीय टाहो फोडून न्याय मागत आहेत. भाजपच्या काळात तर त्यांना न्याय देता आला नाहीच.माझं आव्हान आहे, ज्या सीबीआय ला केस दिली त्याचं काय झालं? सांगा. आमचीही उत्सुकता वाढतीये, असे म्हणत त्यांनी सीबीआयलाही खुलं आव्हान दिलं आहे.तसेच दिशा सॅलियनबद्दल आणखी बोलताना, एका मुलीचा मृत्यू झालाय मात्र तिची बदनामी चालली आहे. तिच्या कुटुंबियांनी वारंवार सांगूनही हे महिलांच्या इज्जतीला किंमत देत नाहीत, असा घणाघात महापौरांनी केला आहे.
नारायण राणेंचे आरोप काय?
नारायण राणे यांनी आरोप करताना, दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला? सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील 8 जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला. राणेंचे हे आरोप आणि पेडणेकरांचे हे प्रत्युत्तर यामुळे या प्रकरणात आता महिला आयोग उतरण्याची शक्याता आहे.
शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची?, राज ठाकरेंनी सांगितलं कारण