मेट्रोने प्रवास आता करा सवलतीने, काय आणली आहे योजना

फेब्रवारी महिन्यात मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता मेट्रोला मिळालेली लोकप्रियता पाहून मुंबई मेट्रोने एक सवलत योजना आणली आहे. प्रवाशांसाठी 'मुंबई 1' कार्ड आणली आहे. त्याद्वारे विशेष सुट मिळणार आहे.

मेट्रोने प्रवास आता करा सवलतीने, काय आणली आहे योजना
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 7:43 AM

मुंबई : मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मेट्रोने आता सवलतीची योजना आणली आहे. प्रथमच मेट्रोकडून सवलत दिली जात आहे. या सवलतीमुळे प्रवाशांची चांगलीच बचत होणार आहेत. तसेच मेट्रोने अधिक प्रवासी प्रवास करणार आहे. मुंबई मेट्रोने ही सवलत आणली आहे. मुंबईची पहिल्या मेट्रोची प्रवाशांची संख्या मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 सुरु झाल्यानंतर वाढली आहे. घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या दोन स्थानकांची जोडणी मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या टप्पा क्रमांक दोनशी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळही वाचत आहे अन् त्यांना वाहतुकीचा चांगला पर्याय मिळाला आहे. तसेच रिक्षा तसेच टॅक्सी सेवेवर खर्च होणाऱ्या पैशात घसघशीत बचत झाली आहे.

‘मुंबई 1’ कार्ड वापरा

मेट्रोची लोकप्रियता पाहून मुंबई मेट्रोने एक सवलत योजना आणली आहे. प्रवाशांसाठी ‘मुंबई 1’ कार्ड आणले आहे. या कार्डचा वापर करुन मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष सुट मिळणार आहे. या कार्डनुसार 30 दिवसांच्या कालावधीत 45 वेळा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 15 टक्के सुट मिळणार आहे. 60 वेळा प्रवास करणाऱ्यांना 20 टक्के सुट मिळणार आहे. ही सुट 30 दिवसांच्या कालावधीसाठी असणार आहे. यासाठी शुल्क ‘मुंबई 1’ कार्डच्या माध्यमातून आकरण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

अनलिमिटेड करा प्रवास

मुंबई मेट्रोच्या माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणी जाणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी ‘अनलिमिटेड ट्रिप पास’ची ही योजनाही आणली आहे. एका दिवसाच्या अनलिमिटेड प्रवासासाठी 80 रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच 3 दिवसांच्या अमर्यादित ट्रिप पासची फी 200 रुपये असणार आहे.

कुठे मिळणार कार्ड

मुंबई 1 कार्ड मुंबई मेट्रोच्या तिकीट काउंटर आणि ग्राहक सेवा काउंटरवर मिळणार आहे. ‘मुंबई 1’ तुमच्या ओळखीच्या कागदपत्रासह सहजपणे मिळवू शकतात आणि रिचार्ज करू शकतात. तसेच या कार्डचा वापर बेस्ट बसमध्येही करता येणार आहे. या कार्डद्वारे सोमवार ते शनिवारपर्यंत पाच टक्के तर रविवारी व राष्ट्रीय सुटी असताना दहा टक्के सुट मिळणार आहे.

अशा आहेत सवलती

  • 45 आणि 60 ट्रिप पास खरेदीच्या तारखेपासून 30 दिवसांसाठी वैध असेल.
  • अमर्यादित ट्रिप पास – 80 रुपये आणि वैधता 1 दिवस, 200 रुपये आणि वैधता 3 दिवस
  • मुंबई मेट्रोचा प्रवास केवळ पासमध्ये नमूद केलेल्या स्थानकांदरम्यान करता येणार आहे
  • मुंबई 1 कार्ड हरवल्यास, कार्डवरील शिल्लक परत मिळणार नाही
  • मुंबई 1 कार्ड खराब झाल्यास, काम करत नसल्यास किंवा हरवले असल्यास, नवीन कार्ड बदलण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल.
  • ट्रिप पासेस फक्त मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी वैध आहेत.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.