आनंदाची बातमी: मानवरहित मेट्रो ट्रेनचे कोचेस मुंबईत दाखल; फेब्रुवारीत ट्रायल रन

मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 (Metro-2A and Metro-7 routes) या मार्गिकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. | Mumbai Metro

आनंदाची बातमी: मानवरहित मेट्रो ट्रेनचे कोचेस मुंबईत दाखल; फेब्रुवारीत ट्रायल रन
येत्या तीन-चार महिन्यात 'या' दोन मार्गांवर धावणार मुंबई मेट्रो
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:34 PM

मुंबई: कारशेडच्या वादामुळे मेट्रो-३ मार्गिकेचे काम रखडले असले तरी मुंबईतील इतर मेट्रो (Mumbai Metro) प्रकल्पांचे काम जोरात सुरु आहे. यापैकी मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 (Metro-2A and Metro-7 routes) या मार्गिकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारीत महिन्यात या दोन्ही मार्गांवर मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. (Mumbai Metro train driverless coach arrived in Mumbai)

त्यासाठी बुधवारी रात्री बंगळुरूहून मानवरहित मेट्रो कोचेस मुंबईत दाखल झाले. एमएमआरडीने याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. मे 2021 पासून मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 ची सेवा सुरु करण्याचा मानस असल्याची एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितले होते. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंगळुरूला जाऊन मेट्रो कोचेसची पाहणीही केली होती. त्यानंतर हे कोचेस मुंबईत आणण्यात आले आहेत.

ट्रायल रन कुठे होणार?

दहिसर-अंधेरी (मेट्रो-7) आणि दहिसर-डी एन नगर (मेट्रो 2 ए) या मार्गिकांसाठी ट्रायल रन होणार आहे. फेब्रुवारीत ट्रायल रनला सुरुवात होईल. त्यानंतर एकूण 576 कोचेस टप्प्याटप्याने मुंबईत दाखल होतील. या दोन्ही मार्गावरची मेट्रो ड्रायव्हरलेस असेल. मात्र सुरूवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू होईल. भारतातच मेट्रो कोचेसची बांधणी होत असल्यामुळे प्रत्येक कोचमागे दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे.

फडणवीसांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, टीका मात्र ठाकरे सरकारवर

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कारशेडच्या वादामुळे रखडलेल्या मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटाही काढला.

मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?

(Mumbai Metro train driverless coach arrived in Mumbai)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.