नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो जादा फेऱ्या चालविणार, पाहा डीटेल्स

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या प्रवाशांना नवरात्री उत्सवाच्या काळात जादा फेऱ्या चालवून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या वाढीव वेळा आणि अतिरिक्त मेट्रो फेऱ्यांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो जादा फेऱ्या चालविणार, पाहा डीटेल्स
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 1:19 PM

नवरात्र उत्सवाला होणारी गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने ( एमएमएमओसीएल ) नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनच्या वाढीव फेऱ्यांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मेट्रो प्रशासनाने  हा निर्णय घेतला आहे. सणाच्यासुदीच्या काळात वाढणारी गर्दी पाहून मेट्रोच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी निर्णय

नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा पुरविण्यात येईल. या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येतील आणि दोन मेट्रो फेऱ्यांदरम्यान १५ मिनिटांचा वेळ असणार आहे. यामुळे या उत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  प्रवासाचा लाभ घेता येईल.

नवरात्रोत्सव लोकांना एकत्र आणतो आणि सर्व भाविकांना तसेच नागरिकांना कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करणे आमची जबाबदारी आहे. मेट्रो ट्रेनच्या सेवा वाढवून आम्ही प्रवाशांना उत्सवादरम्यान रात्री उशीरा होणाऱ्या प्रवासासाठी सोयीस्कर आणि आरामदायक वाहतूक पर्याय प्रदान करीत आहोत असे  महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी  यांनी म्हटले आहे.

वाढीव मेट्रो सेवांचे वेळापत्रक:

२३:०० नंतर नियोजित वाढीव मेट्रो सेवा खालीलप्रमाणे आहेत:

अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली गुंदवली ते अंधेरी (पश्चिम)
२३:१५ - ००:२४ २३:१५ - ००:२४
२३:३० - ००:३९ २३:३० - ००:३९
२३:४५ - ००:५४ २३:४५ - ००:५४
००:०० - ०१:०९ ००:०० - ०१:०९
००:१५ - ०१:२४ ००:१५ - ०१:२४
००:३० - ०१:३९ ००:३० - ०१:३९

अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली:

२३:१५ – ००:२४, २३:३० – ००:३९, २३:४५ – ००:५४, ००:०० – ०१:०९, ००:१५ – ०१:२४, ००:३० – ०१:३९,

गुंदवली ते अंधेरी (पश्चिम) :

२३:१५ – ००:२४, २३:३० – ००:३९, २३:४५ – ००:५४, ००:०० – ०१:०९, ००:१५ – ०१:२४, ००:३० – ०१:३९,

अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'
'लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्...'.
नर्सेस 'लाडक्या बहिणी' नाहीत का? कुठे होतेय अनोखी बॅनरबाजीची चर्चा?
नर्सेस 'लाडक्या बहिणी' नाहीत का? कुठे होतेय अनोखी बॅनरबाजीची चर्चा?.
'श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब..', भरत गोगावले नेमक काय म्हणाले?
'श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब..', भरत गोगावले नेमक काय म्हणाले?.
स्वतःच्या हातून गोविंदाला गोळी लागल्यावर रुग्णालयातून शेअर केला ऑडिओ
स्वतःच्या हातून गोविंदाला गोळी लागल्यावर रुग्णालयातून शेअर केला ऑडिओ.
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, स्वतःच्या हातून बंदुकीतून सुटली गोळी
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, स्वतःच्या हातून बंदुकीतून सुटली गोळी.
अर्ज 'लाडक्या बहिणीं'चे अन् कागदपत्र भावांचे... पैसे घेतले तिसऱ्यानेच
अर्ज 'लाडक्या बहिणीं'चे अन् कागदपत्र भावांचे... पैसे घेतले तिसऱ्यानेच.
नितीन गडकरींच्या 'लाडकी बहिणी'च्या वक्तव्यानं महायुती सरकारचीच कोंडी?
नितीन गडकरींच्या 'लाडकी बहिणी'च्या वक्तव्यानं महायुती सरकारचीच कोंडी?.
दादा-भाजपला धक्का देणार! पक्षात मोठी इन्कमिंग होणार, पवार काय म्हणाले?
दादा-भाजपला धक्का देणार! पक्षात मोठी इन्कमिंग होणार, पवार काय म्हणाले?.