Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : 55 वर्षे माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं नातं, एक अध्याय संपतोय; काँग्रेस नेत्याचा राजीनामा

Milind Deora Resignation from Congress Membership : यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का... मुंबईतील बड्या नेत्याचा राजीनामा... शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती.

मोठी बातमी : 55 वर्षे माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं नातं, एक अध्याय संपतोय; काँग्रेस नेत्याचा राजीनामा
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 9:25 AM

मुंबई | 14 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का… मुंबईतील बड्या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ट्विट करत मिलिंद देवरा यांनी ही माहिती दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा नाराज होते. ते काँग्रेसला रामराम करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती अन् अखेर आज त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 55 वर्षे देवरा कुटुंब आणि काँग्रेस पक्षाचं घनिष्ट नातं होतं. आज हे नातं संपुष्टात आलं आहे. मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. लवकरच ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

देवरा यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केलाय. ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप करत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षाशी असलेलं ५५ वर्षांचं नातं आज संपुष्टात येतंय. माझे सर्व वरिष्ठ नेते, सहकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानतो. त्यांनी वर्षानुवर्षे देवरा कुटुंबाला साथ दिली, त्यामुळे त्यांचे आभार आहे, असं देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मिलिंद देवरा यांचं पुढचं पाऊल काय?

मिलिंद देवरा यांनी ट्विट करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मिलिंद देवरा इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीतील सध्याची स्थिती पाहता ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.

मिलिंद देवरा कोण आहेत?

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते आहेत. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा हे राज्यमंत्री होते. 2014 आणि 2019 मात्र मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना पराभूत केलं. आता मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.