पक्ष सोडल्यानंतर मिलिंद देवरा यांनी का दिल्या काँग्रेसला शुभेच्छा?

Why Milind Deora Wishes To Congress Party : मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षांतरानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षावर भाष्य केलं आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला शुभेच्छा का दिल्या? वाचा सविस्तर...

पक्ष सोडल्यानंतर मिलिंद देवरा यांनी का दिल्या काँग्रेसला शुभेच्छा?
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 6:08 PM

तारीख होती 14 जानेवारी 2024… या दिवशी मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला. वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी सकाळी- सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्याच दिवशी मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर चार महिन्यांनी मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर भाष्य केलं आहे. काँग्रेस पक्षाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांनी या शुभेच्छा का दिल्या? तसंच लोकसभा निवडणूक अन् देवरा यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी का देण्यात आली नाही? यावरही मिलिंद देवरा यांनी भाष्य केलं.

काँग्रेसला शुभेच्छा का?

काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्यात बघायचे दक्षिण मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट जीएस मतदार संघ आहे. त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की आपण ही जागा गमवायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप जास्त बूली केलं. खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. त्यामुळे काँग्रेसला माझ्या शुभेच्छा…, असं मिलिंद देवरा म्हणाले.

कोण विजयी होणार?

दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावरही मिलिंद देवरा यांनी भाष्य केलं आहे. कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवल्या त्यामुळे मी फार आनंदी आहे. यामिनीताई जाधव या फायटर आहेत. यामीन ताई नक्कीच निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी विश्वास केला आहे.

मतदान धीम्या गतीने झालं हे विरोधकांच्या षडयंत्र आहे. आपली हार झाकण्यासाठी त्या पद्धतीचं वक्तव्य करत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी ताई निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे.

गेली 45 वर्षात कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही. तर मी शिवसेनेला धनुष्यबाणाला मत दिलं. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिलं. महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेला आहे, स्वतः एक पांडव आहे त्यातलाच… गिरणी कामगार आणि किरण गावातील लोकांचा फार जातील प्रश्न आहे. विकासाचा आणि या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, न्याय देण्यासाठी काम करायचंय, असंही मिलिंद देवरा म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.