VIDEO | वाहतूक पोलिसांना शिव्या घालणारा 24 तासात वरमला, मुलुंडमधील तरुणाचा माफीनामा

मुंबईतील मुलुंड भागात नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरुन दुकानदार जतीन सतरा याचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला (Mulund Man abused Traffic Police)

VIDEO | वाहतूक पोलिसांना शिव्या घालणारा 24 तासात वरमला, मुलुंडमधील तरुणाचा माफीनामा
वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाचा माफीनामा
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 11:41 AM

मुंबई : नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरुन झालेल्या वादातून पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळ करणाऱ्या तरुणाने जाहीर माफी मागितली. घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अवघ्या 24 तासात तरुणाने पोलिसांची दिलगिरी व्यक्त केली “मुंबई पोलिसांना सलाम करतो, ज्यांना वाईट वाटलं, त्यांची मनापासून माफी मागतो” असा व्हिडीओ जतीन सतरा या तरुणाने ‘मी मुलुंडकर’ या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. (Mumbai Mulund Man Jatin Satra who abused Traffic Police Constables apologies after Video goes viral)

काय आहे माफीनाम्याचा व्हिडीओ?

“मी जतीन प्रेमजी सतरा, मुलुंडचा रहिवासी, आरआरटी रोडवर वाहतूक पोलिसांसोबत मी जे गैरवर्तन केलं, त्यासाठी मी माफी मागतो. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना मी सलाम करतो. ज्या-ज्या पोलिसांना वाईट वाटलं, त्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो” असं जतीन व्हिडीओमध्ये बोलताना दिसतं.

पाहा व्हिडीओ

वाहतूक पोलिसांशी हुज्जत

मुंबईतील मुलुंड भागातील आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरुन दुकानदार जतीन सतरा याचा वाहतूक पोलिसांशी मोठा वाद झाला होता. रागाच्या भरात जतीनने वाहतूक पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तरुणाविषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.

नेमकं काय घडलं होतं?

मुलुंड वाहतूक पोलीस हे आर आर टी रोडवर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करत होते. यावेळी जतीनच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या त्याच्या बाईकवर पोलिसांनी कारवाई केली. यामुळे संतापलेल्या जतीनने वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो दोघांच्या अंगावरही धावून गेला होता. (Mumbai Mulund Man Jatin Satra who abused Traffic Police Constables apologies after Video goes viral)

अखेर वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी जतीनला ताब्यात घेतले. या प्रकरणी वाहतूक पोलीसांनी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी हिसका दाखवताच जतीन नरमला. त्यानंतर त्याने जाहीर माफी मागतानाचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला.

संबंधित बातम्या :

कोरोना नियमांचा भंग, जाब विचारताच शिवीगाळ; हॉटेल मालकाची अधिकाऱ्यांसोबत अरेरावी

मुंबई-आग्रा महामार्गावर मद्यधुंद दीर-भावजयीचा धिंगाणा, महिलेची पोलिसांना धक्काबुक्की

(Mumbai Mulund Man Jatin Satra who abused Traffic Police Constables apologies after Video goes viral)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.