AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये, घरोघरी जाऊन झिंक गोळ्या आणि ओआरएसचे वाटप

अतिसार पंधरवड्याचे मुख्य घटक, अतिसारामध्ये ओ. आर. एस. व झिंकचे महत्व, स्तनपान सुरु ठेवणे, अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर या विषयी महत्त्वाचे संदेश यासह बालकांमधील धोक्याच्या लक्षणांबाबतही माहिती देण्यात येत आहे. सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये योग्यप्रकारे हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत असून हात धुण्याच्या टप्प्यांविषयीचे पोस्टर्स प्रत्येक आरोग्य संस्था व शाळांमध्ये हात धुण्याच्या ठिकाणी लावण्यात येत आहेत.

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये, घरोघरी जाऊन झिंक गोळ्या आणि ओआरएसचे वाटप
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 4:51 PM

‘राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत दिनांक 1 जुलै 2022 ते 15 जुलै 2022 या पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत 0 ते 5 वर्षाच्या बालकांना ओ. आर. एस. (ORS) व झिंक (Zinc) गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांचा समावेश करण्यात आला आहे. या वयोगटातील बालकांना ओ. आर. एस. (ORS) व झिंक (Zinc) ची गोळी देऊन अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू  (Death)शुन्य करणे, हे या कार्यक्रमाचे (Program) उद्दीष्ट आहे. यासाठी गृहभेटीदरम्यान प्रत्येक बालकासाठी 1 ओ. आर. एस. (ORS) पाकीट हे बाळाला भविष्यात जुलाब, हगवण झाल्यास वापरण्याकरीता पालकांना वापरण्याच्या माहितीसह देण्यात येत आहे.

मातांना अतिसाराचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयीची माहिती देणार

सदर भेटीदरम्यान अतिसार झालेली बालके आढळल्यास त्यांना आवश्यकतेनुसार ओ. आर. एस. (ORS) व झिंक (Zinc) गोळ्या देखील देण्यात येत आहेत. तसेच या अनुषंगाने बालकांचा आजार कमी न झाल्यास अथवा अतिसाराचे प्रमाण आढळल्यास पालकांनी त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्र / दवाखाना / रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शाह यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम’ या अंतर्गत आयोजित पंधरवड्यादरम्यान एएनएम, आशा किंवा आरोग्य सेविका यांच्यामार्फत 0 ते 5 वर्षाखालील बालकांच्या मातांना अतिसाराचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयीची माहिती देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

बालकांमधील धोक्याच्या लक्षणांबाबतही माहिती

अतिसार पंधरवड्याचे मुख्य घटक, अतिसारामध्ये ओ. आर. एस. व झिंकचे महत्व, स्तनपान सुरु ठेवणे, अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर या विषयी महत्त्वाचे संदेश यासह बालकांमधील धोक्याच्या लक्षणांबाबतही माहिती देण्यात येत आहे. सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये योग्यप्रकारे हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत असून हात धुण्याच्या टप्प्यांविषयीचे पोस्टर्स प्रत्येक आरोग्य संस्था व शाळांमध्ये हात धुण्याच्या ठिकाणी लावण्यात येत आहेत. ‘कोविड’ काळात हात धुण्याचे नियमित पालन केल्याने गॅस्ट्रोचे रुग्ण कमी प्रमाणात आढळले होते, ही बाब आवर्जून नोंद घ्यावी, अशी महत्त्वाची बाब असल्याचेही डॉ. शाह यांनी या निमित्ताने कळविले आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र, दवाखाना व महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ओ. आर. एस. (ORS) व झिंक (Zinc) कॉर्नरची स्थापना देखील करण्यात येत आहे. या मोहिमेकरिता सहाय्यक परिचारीका प्रसविका, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्ते यांची मदत घेण्यात येत आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.