BMC Election 2022 (ward 209): शिवसेनेलाच प्रभाग क्र. 209 मध्ये करावी लागणार कसरत; या निवडणुकीत मात्र आता गणितं वेगळी असणार
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा एकत्र आली तर प्रभाग क्र. 209 काँग्रेसकडेच राहणार की त्यावर वेगळा उमेदवार देणार हे आता काही दिवसांनी स्पष्ट होईल मात्र असे झाले तर मनसे आणि भाजपला येथे कडवी टक्कर द्यावी लागणार हे मात्र नक्की आहे.
मुंबईः राज्यातील महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांचे चित्र दरवर्षीपेक्षा वेगळं असण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेतून बंडखोरी केलेला एकनाथ शिंदे गट भाजपला जाऊन मिळाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Elections) निश्चित याचे वेगळे परिणाम दिसणार आहेत एवढं मात्र नक्की. कारण ज्या शिवसेनेने (Shivsena) कित्येक वर्षं महानगरपालकेवर जो भगवा फडकवला आहे त्यामध्ये आता दोन गट पडले आहेत, त्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनपा निवडणुकीवर दिसण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे प्रभाग क्र. 209 (Ward No. 209) मध्ये जरी 2017 मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आला असला तरी आगामी निवडणुकीत मात्र येथील उमेदवाराला खरी कसरत करावी लागणार आहे.
शिवसेनेविऱोधात काँग्रेस
प्रभाग क्र. 209 मध्ये शिवसेनेच्या यशवंत जाधव यांना काँग्रेसचे बगदादी मंझूरहसन अब्दुल लतिफ यांनी जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी शिवसेनेविऱोधात काँग्रेस लढली असली तरी यावेळी मात्र चित्र वेगळं असण्याची शक्यता आहे कारण जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राष्ट्रवादीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच स्पष्ट केले होते, मनपा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी जर एकत्र लढले तर चित्र वेगळं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
महाविकास आघाडी पुन्हा एकत्र आली तर
त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा एकत्र आली तर प्रभाग क्र. 209 काँग्रेसकडेच राहणार की त्यावर वेगळा उमेदवार देणार हे आता काही दिवसांनी स्पष्ट होईल मात्र असे झाले तर मनसे आणि भाजपला येथे कडवी टक्कर द्यावी लागणार हे मात्र नक्की आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार
बगदादी मंझूरहसन अब्दुल लतिफ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-3853 चव्हाण महेश चंद्रकांत (अपक्ष)-104 डिसोझा संतोष अल्फ्रेड (अखिल भारतीय सेना)-1607 दुबे श्यामबिहारी रामनरेश (बहुजन समाज पार्टी)-189 यशवंत जाधव (शिवसेना) 4884 अब्दुलमलिन शमसुद्दी खान (समाजवादी पार्टी)-436 खान तन्वीरआलम शमीमअहमद (भारि बहुजन महासंघ)-71 मुकादम इरफान उमर (अपक्ष)-132 नाईक मतिन अ.अली (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन)-1760 अॅड. कांतीलाल पोपटलाल संगोई (भारतीय जनता पार्टी)-1953 सावंत सुशिल चंद्रकांत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)- 910 शेख निखत निसार (अपक्ष)- 56 शेटे नितीन ज्ञानदेव (राष्ट्वादी काँग्रेस पार्टी) 1129 वाजे अनिल तुकाराम (अपक्ष)- 1225 NOTA-247
वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत
प्रभाग क्रमांक 209 सेंट जेवियर स्टेट व गोविंदजी केने मार्गाच्या नाक्यापासून गोविंदजी केने मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे जेरी बाई वाडिया रोड पर्यंत तिथून जेरी बाई वाडिया रोडच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे रफी अहमद किडवाई रोडपर्यंत तिथून रफी अहमद किडवाई रोडच्या पश्चिम बाजूने प्रबोधनकार ठाकरे मार्गापर्यंत तिथून प्रबोधनकार ठाकरे मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे आचार्य धोंदे मार्गापर्यंत तिथून आचार्य दोंदे मार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे खानोलकर चौक ओलांडून पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत तिथून पूर्व द्रुतरती महामार्ग येथे जेरी बाई वाडिया रोड पर्यंत तिथून जेरी बाई वाडिया रोडच्या बाजूने पूर्वेकडे टाटा मेमोरियल हॉस्पिटल पर्यंत तिथून टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या समावेशासह पश्चिम दिशेकडील टोकाकडे पूर्व बाजूने उत्तरेकडे सेंट झेवियर स्टेट पर्यंत तिथून सेंट झेवियर स्ट्रीटच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे गोविंद घेणे मार्गापर्यंत या प्रभागांमध्ये गोलंच टेकडी आंबेडकर नगर राष्ट्रीय मिल मजदूर संघ इन्स्टिट्यूट टाटा हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल या ठिकाणांचा समावेश होतो
महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | यशवंत जाधव | यशवंत जाधव |
काँग्रेस | बगदादी मंझूरहसन अब्दुल लतिफ | |
राष्ट्रवादी काँग्रेस | शेटे नितीन ज्ञानदेव | |
भाजप | अॅड. कांतीलाल पोपटलाल संगोई | |
मनसे | सावंत सुशिल चंद्रकांत | |
अपक्ष | चव्हाण महेश चंद्रकांत |