विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राल पत्र

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमधील कालावधी कमी करावा, अशी मागणी मुंबई महापालिकेने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. (mumbai municipal corporation corona vaccine)

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राल पत्र
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 8:11 PM

मुंबई : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमधील (Corona vaccine dose) कालावधी कमी करावा, अशी मागणी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेने विशेष लसीकरण सुरु केलं आहे. मात्र दोन लसींमधील अंतरामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यासाठी आता मुंबई महापालिकेने केंद्राला विनंती केली आहे. (Mumbai Municipal Corporation writes letter to central government demand decrease gap between two Corona vaccine doses for students)

दोन लसींमधील कालावधी 84 दिवसांवरून 42 ते 60 दिवसांवर करण्याची मागणी

सध्या कोविशिल्डच्या दोन लसींमधील कालावधी 84 दिवसांचा असल्याने, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, दोन लसींमधील कालावधी 84 दिवसांवरून 42 ते 60 दिवसांवर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतची माहिती दिली.

परदेशात ऑगस्टच्या सुरुवातीला कॉलेज सुरु होत असल्यानं त्यापूर्वी दोन्ही लस दिल्याचे सर्टिफिकेट मुलांना मिळणे आवश्यक आहे. सध्या मुंबईत सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी कस्तुरबा, कूपर आणि राजावडी इथं परदेशात जाणाऱ्यांना विद्यार्थ्यांना लस देणे सुरू आहे.

मुंबई महापालिकेचा पुढाकार

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबाबतच्या सुधारित नियमावलीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना वॉक इन (Walk In) सुविधेद्वारे लस दिली जाणार आहे. यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल.

ऑनस्पॉट वॉक इनसाठी पात्र लाभार्थी वर्ग

-45 आणि त्यावरील वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या / दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि दिव्यांगांना प्राधान्य असेल

-आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कस कोविशील्डच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी

-कोव्हॅक्सिनच्य सर्व वयोगटातील दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि दिव्यांगांना प्राधान्य

-स्तनदा माता

-18 ते 44 वयोगटातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा

-गुरुवार, शुक्रवार, शनिवार कोव्हिन अॅपवरील नोंदणीनुसारच 100 टक्के लसीकरण

ठाण्यात पहिल्याच दिवशी परदेशात जाणाऱ्या 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेंतर्गत आज पहिल्याच दिवशी 195 विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला.

लसीचा तुठवडा असल्याने विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते, या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता, ही बाब लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशनानुसार परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची नियोजन केले. त्यानुसार लसीकरण सुरू करण्यात आले असून पहिल्याच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

विद्यार्थ्यांना ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा उपलब्ध 

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सदरच्या केंद्रात लस देण्यात येत असून परदेश प्रवेशपत्र, व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस देण्यात येत आहे. तरी महापालिका क्षेत्रातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

बालरोग तज्ज्ञांना ट्रेनिंग, गृहभेटींवर भर; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान

Breaking : ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करुन काय साध्य होणार?’ खासदार संभाजीराजेंचा सवाल

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात दोन महिने मासेमारीसाठी बंदी, मंत्री अस्लम शेख यांची घोषणा

(Mumbai Municipal Corporation writes letter to central government demand decrease gap between two Corona vaccine doses for students)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.