मुंबईत मराठी माणूस नॉट अलाऊड ? महिलेला ऑफीससाठी जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर अखेर गुन्हा दाखल

मुंबईत हा धक्कादायक हा प्रकार घडला आहे. ऑफीससाठी जागा बघायला गेलेल्या मराठी महिलेला थेट नकार देण्यात आला. आमच्या इमारतीत मराठी माणसं अलाऊड नाहीत, जे करायचं ते करा अशा शब्दांत, उर्मट स्वरात त्यांना उत्तर मिळालं. त्या महिलेने संपूर्ण प्रकार कथन करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

मुंबईत मराठी माणूस नॉट अलाऊड ? महिलेला ऑफीससाठी जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर अखेर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 12:32 PM

मुलुंड | 28 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये (mumbai) मराठी माणसाची गळचेपी होत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. मात्र मुलुंडमधील एका घटनेने ते सिद्धही झाले आहे. मुलुंड पश्चिमेकडील एका इमारतीत मराठी महिलेला (marathi woman) तिच्या ऑफीससाठी जागा (refused space for office in building) देण्यास नकार दिल्याने वादाला तोंड फुटले होते. मराठी माणसाला काहीच किंमत नाही का असा सवाल त्यानंतर उपस्थित झाला. अनेक राजकीय पक्षांनी या वादात पडून सरकारवर ताशेरे ओढत स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर याप्रकरणी जागा नाकारणाऱ्या त्या पिता-पुत्राच्या जोडीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी पिता पुत्र, दोघांनाही अटक केली.  त्यांच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे.

काय आहे हे प्रकरण ?

तृप्ती देवरुखकर या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. तिने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून तिची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. तृप्ती यांच्या सांगण्यानुसार, मुलुंड पश्चिमेकडील शिव सदन या इमारतीमध्ये त्या ऑफीससाठी जागा पहायला गेल्या होत्या. मात्र तेथील सेक्रेटरीने त्यांना जागा देण्यास नकार दिला. ‘इथे महाराष्ट्रीयन लोक अलाऊड नाहीयेत. मराठी माणसांना जागा देण्यास इथे परवानगी नाही’ असे त्याने स्पष्ट केले. या अजब मुद्यानंतर तृप्ती यांनी त्यांना जाब विचारला असता, तो इसम हमरीतुमरीवर आला. तुम्हाला जे करायचंय ते करा, पोलिसांना किंवा ज्याला कोणाला बोलवायचं ते बोलवा, गुर्मीत असं उत्तर त्याने आणि त्यांच्या मुलाने तृप्ती यांना दिलं. तिने हा सर्व प्रकार मोबाईलवर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तिच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला.

या सर्व प्रकारामुळे उद्विग्न झालेल्या तृप्ती यांनी यासंदर्भातील व्हिडीओ रेकॉर्ड करून शेअर केला आणि बघता बघता तो प्रचंड व्हायरल झाला. मनसे, शिवसेना, काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्षांनी त्यांचा हा व्हिडिओ री-पोस्ट करत हा मुद्दा उचलून धरला. मनसेचे पदाधिकारी तर त्या महिलेसह त्या इसमाला जाऊन भेटले आणि जाब विचारत मनसेस्टाईल दणका देण्याचा इशाराही दिला.

अखेर पोलिसांत गुन्हा दाखल

तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रविण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर या दोघांविरोधात मध्यरात्री गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनसेचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत संदीप देशपांडे यांनी तर याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत अशा लोकांना दणका देण्याचा इशाराही दिला. “केम छो वरळी “होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात. ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.