हाती ट्रॅक्टरचं स्टेरिंग, रस्त्यावर पाणी मारत सफाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जुहू बीचवर स्वच्छता

CM Eknath Shinde Cleaning at Juhu Beach : डीप क्लिन ड्राईव्ह उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जुहू बीचवर स्वच्छता करण्यात आली. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील प्रदुषणावर भाष्य केलं. नेमकं काय म्हणाले? पाहा...

हाती ट्रॅक्टरचं स्टेरिंग, रस्त्यावर पाणी मारत सफाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जुहू बीचवर स्वच्छता
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 9:30 AM

सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 09 डिसेंबर 2023 : मुंबईतील वाढतं प्रदुषण पाहता सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी ट्रॅक्टरचं स्टेरिंग मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाती घेतलं. तसंच पाण्याचा पाईप हाती घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. डीप क्लिन ड्राईव्ह उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत होणाऱ्या स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सध्या मुंबईतील समुद्र किनारी ऑटोमॅटिक मशीनमधून कचरा उचलला जातो. त्यामुळे समुद्र किनारी असणारी वाळू तशीच राहते. यामुळे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी मदत मिळेल. शहरापासून झोपडपट्टीपर्यंत टप्या टप्प्याटप्प्यात सगळीकडे स्वच्छता केली जाईल. मुंबईतील प्रदुषण रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांना उत्तर

आम्ही कोणाच्या आरोपाकडे लक्ष देत नाही. आम्ही काम करतो. तीस हजार कर्मचारी आज या कामासाठी एक तास अगोदर रस्त्यावर उतरत आहे. जे आरोप करतात त्यांना लवकरच याचा रिझल्ट दिसतील आणि त्यांचे डोळे पांढरे होतील, असं म्हणत विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

इस्कॉन मंदिरात दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहूमधील इस्कॉन मंदिरात जात दर्शन घेतलं. तसंच आरती देखील केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मंदिराच्या पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चार करून स्वागत करण्यात आलं. इस्कॉन स्वतः चांगला उपक्रम राबवत आहे. अन्नदान , परियावरण , तरुण मार्गदर्शन सह पालिकेच्या सोबत मिळून रुग्णालय व शाळेत अन्नदान करणं मोठं काम आहे, असं शिंदे म्हणाले.

देशाचे प्रधानमंत्री देशाला उंच नेण्याचं काम करतात. आज स्वच्छता मोहीममध्ये आपल्याला ही सहभागी करून घेणार आहोत. स्वच्छता मोहीम ही चळवळ म्हणून मी व्यक्तीशा लक्ष देतोय. मुंबईचा सफाई चा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. मी आव्हान केल्यानंतर एकदाच लवकर येऊन ते काम करतात. याचा परिणाम खूप चांगला होईल, असंही ते म्हणाले.

सेल्फी पॉईंटला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू परिसरातील आय लव मुंबई सेल्फी पॉईंट उद्यानाला भेट दिली. यावेळी मंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आणि स्थानिक आमदार दीपक सावंत यांच्यासोबत फोटो सेक्शन करत उद्यानाची त्यांनी पाहणी केली.

Non Stop LIVE Update
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण.
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा.
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी.