‘वर्षा’ बंगल्यावर 2 तास बैठक अन् 3 महत्वाचे मुद्दे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ‘या’ बाबींवर चर्चा
CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting at Varsha Bungalow : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, शिंदे-फडणवीस-पवार बैठकीत नेमकं काय घडलं? ते तीन महत्वाचे मुद्दे नेमके काय? बैठकीतील चर्चेचे मुद्दे, वाचा सविस्तर...
मुंबई | 01 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्र्यांच्या मु्ंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक झाली. या तिघांमध्ये काल रात्री दोन तास बैठक झाली. या बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता ही बैठक महत्वपूर्ण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होतेय. अशात या बैठकीला विशेष महत्व आहे. रात्री उशीरा झालेल्या या बैठकीत तीन मुद्द्यावर चर्चा झाली.
या तीन मुद्द्यांवर चर्चा
राज्यात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. अशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला विशेष महत्व आहे. राज्यात सध्या मराठा, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. आज दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होतेय. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अन् भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीआधी काल रात्री झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?
मागच्या वर्षी शिंदे सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेल नाहीये. मध्यंतरी अजित पवार गटाचे नेते या सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शिंदे गट आणि भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावर काल रात्री झालेल्या या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
अजितदादा अन् नाराजी
नुकताच गणेशोत्सव पार पडला. या काळात नेत्यांनी एकमेकांच्या घरी भेटी दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विसर्जनाच्या आदल्या दिवशी विविध ठिकाणी जात गणपतीचं दर्शन घेतलं. लालबागचा राजा अन् सिद्धविनायकाचं त्यांनी दर्शन घेतलं.याच दिवशी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात गणरायाचं दर्शन घेतलं. पण यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट दिली नाही. या गोष्टीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा होतेय. त्यानंतर काल रात्री झालेल्या या बैठकीला विशेष महत्व आहे.