मुंबईत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्लँट, नेमका प्रकल्प कसा काम करतो?

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज ऑक्सिजन प्लँटचे उद्धाटन करण्यात आलं आहे. (Mumbai Oxygen Plant Produce Oxygen from the Air )

मुंबईत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्लँट, नेमका प्रकल्प कसा काम करतो?
फोटो प्रातिनिधिक
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 12:20 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. राज्य सरकारकडून ऑक्सिजनची तूट भरुन काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईत कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला प्लँट बसवण्यात आला आहे. (Mumbai Oxygen Plant Produce Oxygen from the Air)

रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासली होती. काही रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं होतं. तेव्हापासून मिशन ऑक्सिजन सुरु आहे. पवई येथील हिरानंदानी रुग्णालयाने पहिलं हवेतून ऑक्सिजन तयार करणारा प्लँट बसवला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज ऑक्सिजन प्लँटचे उद्धाटन करण्यात आलं आहे.

या ऑक्सिजन प्लँटमध्ये आजूबाजूला असणारी हवा आत खेचून घेतली जाते. मग टप्प्याटप्पाने प्रक्रिया करून ऑक्सिजन वेगळं केलं जातं. त्यानंतर हा ऑक्सिजन रुग्णालयात पोहोचवला जातो. मात्र हा ऑक्सिजन हा प्लँट कसा चालतो?  याचा आम्ही माहिती घेणार आहोत.

मुंबईतील ऑक्सिजन प्लँटचे नेमका कसा चालतो?

?हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँटची वैशिष्ट्य ?या प्लँटची दैनंदिन क्षमता 10 लाख लिटर ऑक्सिजन निर्मितीची आहे ?प्लॅटचा संपूर्ण खर्च हा 70 ते 80 लाख आहे ?लिकक्विड प्लॅटपेक्षा वेगाने ऑक्सिजन निर्मिती ही या प्लॅटमध्ये होते ?सुरुवात हवेतील ऑक्सिजन हा कॉम्फ्रेश मशीन मध्ये खेचून घेतला जातो ?मग पुढे ही हवा फिल्टर करून त्याला तेलजन्य पदार्थ वेगळे केले जातात ?मग यातून हवेतून ऑक्सिजन वेगळा करून प्रेशर केला जातो ?पुढे तो रुग्णालयात रुग्णासाठी पाठवला जातो

ऑक्सिजन प्लांट नेमका कसा तयार होतो?

हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्‍स‍िजन असताना पुन्‍हा तो शोषून नव्‍याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्‍वाभाव‍िक आहे. वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फ‍िल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात.

या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्‍स‍िजन जनरेटर’मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन अर्थात प्राणवायू हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो. (Mumbai Oxygen Plant Produce Oxygen from the Air)

संबंधित बातम्या : 

मुंबईच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबईकडे परस्पर वळवल्याचा आरोप, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे FDA ला पत्र

कशी होणार ऑक्सिजन निर्मिती?; कसा असेल मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट?; वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.