TRP Scam | टीआरपी घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक, आतापर्यंत 11 जण गजाआड

टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (28 ऑक्टोबर) आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

TRP Scam | टीआरपी घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक, आतापर्यंत 11 जण गजाआड
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 8:32 PM

मुंबई : टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (28 ऑक्टोबर) आणखी एका आरोपीला अटक केली आहे. यासह या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 11 पर्यंत पोहचली आहे. आज अटक केलेल्या आरोपीचं नाव आशिष अबीदूर चौधरी असं आहे. आशिष चौधरी आज मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. त्याला अटक करुन कोर्टात हजर केलं असता त्याला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे (Mumbai Police arrest 11th Accused in TRP Scam).

आशिष चौधरी हा क्रिष्टल ब्रॉडकास्ट कंपनीशी संबंधित आहे. आरोपीची पत्नी शर्मिष्ठा ही कंपनीची डायरेक्टर आहे. मात्र, कंपनीचं काम आरोपी आशिष हाच पाहत होता. त्याचा केबल चॅनेल वितरणाचा व्यवसाय आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 वा आरोपी अभिषेक कोलवडे याच्या चौकशीत आशिष चौधरी याचं नाव आलं होतं. त्यानंतर आशिष चौधरी याला अटक करण्यात आली.

आशिष चौधरी याने अभिषेक कोलवडे याला पैसे दिले आहेत. आशिष हा अभिषेख कोलवडे याला दर महिन्याला 5 लाख रुपये देत होता. ते पैसे अभिषेक ज्यांच्या घरात बॅरोमिटर लावलं आहे त्यांना वाटत होता. क्रिष्टल ब्रॉडकास्ट प्रा. लि. ही कंपनी न्यूज नेशन या चॅनेलचं अधिकृतपणे वितरणाचं काम पाहते. आशिष चौधरी हा अभिषेक कोलवडे याला गेल्या 2 वर्षांपासून पैसे देत आहे. ऑगस्ट महिन्यात आशिषने अभिषेकला 4 लाख रुपये रोख दिले होते.

आशिषने अभिषेकला पैसे दिल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आशिष चौधरीकडे 1 लाख रुपये कॅश सापडली आहे. आतापर्यंत टीआरपी घोटाळा प्रकरणात 46 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपी क्रमांक 10 अभिषेख कोलवडे याची मॅक्स मीडिया कंपनी आणि आरोपी क्रमांक 11 आशिष चौधरी याची क्रिष्टल ब्रॉडकास्ट प्रा. लि. या कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे. या व्यवहाराचं ऑडिटही केलं जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणी महा मुव्हीचे सीईओ आणि इतर संचालक यांना आज पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. ते सध्या फरार झाले आहेत. मुंबई पोलीस त्यांच्या शोधात आहेत. ते हजर होत नसल्याने त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

TRP घोटाळा : साक्षीदार होण्याच्या तयारीनंतर आरोपीला जामीन; तर चॅनेल मालकासह पाच जणांचे अर्ज फेटाळले

TRP तपासात NBA मुंबई पोलिसांच्या पाठिशी, सीबीआय चौकशी मागे घेण्याची मागणी

TRP Scam | उत्तर प्रदेशातील टीआरपी केसची चौकशी सीबीआयकडे, केंद्राचा निर्णय

Mumbai Police arrest 11th Accused in TRP Scam

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.