चीनमध्ये बसून मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक, पाच मिनिटांत बँक खाते रिकामे, काय आहे प्रकार?

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी फसवणूक करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी उघड केली आहे. या टोळीचा म्होरक्या चीनमध्ये बसून सर्व सूत्र हलवत आहे. भारतात पकडलेल्या आरोपीचा अल्पवयीन मुलगा त्याच्यासोबत चीनमध्ये काम करत आहे.

चीनमध्ये बसून मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक, पाच मिनिटांत बँक खाते रिकामे, काय आहे प्रकार?
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 1:10 PM

गोविंद ठाकूर, मुंबई : मुंबई पोलिसांच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढते आहेत. चीनमध्ये बसून लोकांची बँक खाती रिकामी करणारी टोळी पोलिसांनी शोधली आहे. या टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यांवर विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल आहे. परंतु टोळीचा मास्टरमाइंट चीनमध्ये बसला असून तेथून तो सूत्र हलवत आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागणार आहे.

मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील पाच जणांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचे मास्टरमाइंड चीनमध्ये बसून भारतातील विविध राज्यात ऑनलाइन फसवणूक करत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीतील लोक व्हॉट्सअॅप आणि स्काईप अॅपच्या माध्यमातून बहुतांश महिलांना टार्गेट करायचे.

हे सुद्धा वाचा

अटक करण्यात आलेले आरोपी स्वतःला मुंबई पोलिसांचे अधिकारी सांगत होते. त्यासाठी त्यांनी डुप्लिकेट पोलीस ओळखपत्र तयार केले होते. अनेक वेळा पोलिसांचा युनिफॉर्म घालून व्हिडिओ कॉलवर ते बोलत होते. लोकांना फोन करून तुमच्या नावाच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडले आहेत, असे सांगत होते. मग कारवाईच्या नावाखाली धमकावून त्यांचे बँक खाते व इतर तपशील घेऊन ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करत होते. बँकेचा तपशील मिळाल्यावर ५ मिनिटांत संपूर्ण बँक खाते रिकामा केले जात होता. जे काही पैसे ट्रान्सफर करायचे ते मुख्य आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात जात होते.

कोठून केली अटक

मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, या आरोपींना कोलकाता, मुंबई आणि विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, हैदराबाद, सायबराबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये अशा ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

कोण आहेत आरोपी

सुमारे दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात संजय नीळकंठ मंडळ, अनिमेश अजितकुमार वैद्य, महेंद्र अशोक रोकडे, मुकेश अशोक दिवे यांचा समावेश आहे. मुख्य आरोपीचे नाव आहे श्रीनिवास राव सुब्बाराव दाडी (वय 49 वर्षे) आहे. तो हैदराबाद, तेलंगणाचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथील नोव्होटेल हॉटेलमधून अटक केली.

चीनचे काय आहे कनेक्शन

पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपीने सांगितले की, त्यांचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसला आहे. त्याच्या इशाऱ्यावर लोक भारतातील विविध राज्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करतात. यात मुख्य आरोपी श्रीनिवास सुब्बाराव दाडी याचा अल्पवयीन मुलगाही आहे, मात्र तो सध्या चीनमध्ये आहे.

पोलिसांनी काय केले जप्त

पोलिसांनी आरोपींकडून पॅनकार्ड, डेव्हिड कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, लॅपटॉप, मोबाईल फोन, स्टॅम्प रबर असे अनेक साहित्य जप्त केले आहे. सध्या बांगूर नगर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचाही शोध घेत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.