मोठी बातमी: किरीट सोमय्यांच्या मुलाची जुन्या वादातून कसून चौकशी

सध्या नील सोमय्या यांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता या चौकशीनंतर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. | Kirit Somiaya

मोठी बातमी: किरीट सोमय्यांच्या मुलाची जुन्या वादातून कसून चौकशी
सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी सुरु आहे, ते प्रकरण बरेच जुने आहे. त्यावेळी नील सोमय्या यांच्यावर खंडणीचा कोणताही गुन्हाही दाखल झाला नव्हता. मात्र, आज पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे या चौकशीनंतर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 9:28 PM

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा पूत्र नील सोमय्या याची एका जुन्या वादातून पोलीस चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी काहीवेळापूर्वीच नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते.  मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली. (Mumbai Police interrogate Kirit somaiya son in extortion case)

मुलुंडच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आज नील सोमय्या यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली. नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी सुरु आहे, ते प्रकरण बरेच जुने आहे. मात्र, आज पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आहे. या चौकशीनंतर नील सोमय्या घरी परतले आहेत. मात्र, आगामी काळात पोलीस नील सोमय्या यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून किरीट सोमय्या हे सातत्याने सरकारच्या त्रुटी शोधून काढत असतात. त्यांनी गेल्या काही काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उकरून काढली आहेत. प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या ‘ईडी’ चौकशीवेळी तर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला सळो की पळो करुन सोडले होते.  मध्यंतरी अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराच्या मुद्द्यावरुन त्यांनी थेट शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांना अंगावर घेतले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून किरीट सोमय्या यांना आम्हीही तुमचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा देण्यात आला होता.

एकदा किरीट सोमय्यांच्या आरोपांची मालिका संपू द्या, दिवाळीनंतर आम्ही सुरु करु: शिवसेना

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारने तीन घोटाळे केल्याचा आरोप केला होता. या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश होता.

त्यावेळी शिवसेना आमदार अनिल परब यांनी सोमय्या यांच्यावर प्रतिहल्ला केला होता. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर एकदाचे काय ते सर्व आरोप करून घ्यावेत. दिवाळीनंतर शिवसेना त्यांच्यावर कोणते आरोप करते ते पाहाच आणि तेव्हा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देण्यास तयार राहावे, असा गर्भित इशारा राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी दिला होता.

किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका एकदा संपू द्या. आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही आरोपात तथ्य सापडलेले नाही. शिवसेना त्यांच्या प्रत्येक आरोपाची चिरफाड करेल, असे अनिल परब यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल

ठाकरे सरकारच्या तीन विकेट निश्चित, पहिली विकेट आव्हाडांची पडणार : किरीट सोमय्या

(Mumbai Police interrogate Kirit somaiya son in extortion case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.