VIDEO: दुचाकीस्वार : साहेब हेल्मेट कुठाय?, तू कोण विचारणार, चल पुढं…उद्दाम पोलिसाची मग्रुरी
मुंबई : सर्वसामान्यांना कायद्याच्या धाकत ठेवणारे पोलीस स्वत: मात्र कायदा पायदळी तुडवत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. विनाहेल्मेट दुचाकीवाल्यांशी तर पोलिसांचं वागणं कसं असतं हे सर्वांनाच परिचीत आहे. मुंबईत एका मुजोर पोलिसाची मग्रुरी समोर आली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या, सिग्नल तोडून मोबाईलवर बोलत जाणाऱ्या या पोलिसाला दुसऱ्या एका बाईकस्वाराने त्याबाबत विचारणा केली. त्यावर या […]
मुंबई : सर्वसामान्यांना कायद्याच्या धाकत ठेवणारे पोलीस स्वत: मात्र कायदा पायदळी तुडवत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. विनाहेल्मेट दुचाकीवाल्यांशी तर पोलिसांचं वागणं कसं असतं हे सर्वांनाच परिचीत आहे. मुंबईत एका मुजोर पोलिसाची मग्रुरी समोर आली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या, सिग्नल तोडून मोबाईलवर बोलत जाणाऱ्या या पोलिसाला दुसऱ्या एका बाईकस्वाराने त्याबाबत विचारणा केली. त्यावर या पोलिसाने तू कोण मला विचारणार, तुझा संबंध काय, असा प्रतिप्रश्न मग्रुरीत केला.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड धुमाकुळ घालतोय. हा पोलीस विना हेल्मेट प्रवास करतोय, तो सिग्नलही तोडतो. मात्र या पोलिसाला हेल्मेट न घातल्याबद्दल विचारणा केली असता तो काय म्हणतो हे व्हिडीओत दिसतं. कायदा सर्वांना समान असताना केवळ वर्दीचा रूबाब दाखवणं हे लक्षण का चांगल्या पोलिसाचं नक्कीच नाही.
दुचाकीस्वार : साहेब हेल्मेट कुठाय?,
पोलीस : तू कोण विचारणार, चल पुढं, तुझा काय संबंध?
दुचाकीस्वार: तुम्ही सिग्नलपण तोडलात मागे
पोलीस : हां तोडला.. मी उडवणार आहे, तू जा आपला माझ्या नादाला लागू नको https://t.co/E5WZiUABg1 @MumbaiPolice @CMOMaharashtra pic.twitter.com/Y3UBCatQBG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2019
या व्हिडीओत काय आहे?
पोलिसाने आधी सिग्नल तोडला, गाडी चालवताना फोनवर बोलतोय
दुचाकीस्वाराने विचारलं : काय साहेब हेल्मेट कुठाय ?
पोलीस : काय झालं ?
दुचाकीस्वार: हेल्मेट हेल्मेट
पोलीस : कुठलं ?
दुचाकीस्वार: डोक्यावर घालायचं
पोलीस : तू कोण विचारणार ?
दुचाकीस्वार: मी कोण विचारणार ?
पोलीस : ए जा मला विचारायचं नाही ! तुला अधिकार नाही ! तू पोलीस नाही !चल पुढं ! मला विचारायचा तुला काय अधिकार ? चल पुढं !
दुचाकीस्वार: तुम्ही सिग्नलपण तोडलात मागे
पोलीस : हां तोडला.. मी उडवणार आहे, तू जा आपला माझ्या नादाला लागू नको