Mumbai Power Cut: तपास पथकाचा अहवाल आठवडाभरात येणार; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच- राऊत
आयलँडिंग होणे ही साधीसुधी बाब नाही. त्यामुळे घातपात झाल्याची शक्यता बळावली आहे | Mumbai Power cut action
मुंबई: मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. आठडाभरातच तपास पथकाचा अहवाल येईल. त्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. (Mumbai Power cut action will be taken says Nitin Raut)
तसेच मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे काही घातपात आहे का, यादृष्टीने चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. महापरेषणच्या कळवा-पडघा लाईनवर काम सुरु असताना सर्व भार सर्किट 1 वरुन सर्किट 2 वर वळवण्यात आला होता. त्यावेळी सर्किट 2 अचानक बसले. यानंतर आयलँडिंग होऊन मुंबईतील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. मात्र, आयलँडिंग होणे ही साधीसुधी बाब नाही. काही लोक उर्जा खात्याला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे या सगळ्यामागे घातपात असल्याची शक्यता बळावल्याचे नितीन राऊत यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
A technical committee is being formed, they will do a technical audit – if there was sabotage and who were responsible for it. An interim report will come within a week. Action will then immediately be taken, based on the interim report: Maharashtra Energy Minister Nitin Raut https://t.co/JJWkAlcpZ2 pic.twitter.com/4vn6JlU35A
— ANI (@ANI) October 14, 2020
या पार्श्वभूमीवर आज बैठक होणार असून चौकशी समितीची स्थापना केली जाईल. यावेळी मागच्या काळात अभ्यासगटांनी दिलेल्या अहवालावरही चर्चा केली जाईल. या अहवालानंतर त्यावेळी उर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अॅक्शन टेकन रिपोर्ट ATR तयार झाला होता का, हे तपासले जाईल. तो झाला नसेल तर त्याची कारणे संबंधित अधिकाऱ्यांना विचारली जातील. यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सोमवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. रेल्वे वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालये, कोविड सेंटर आणि दैनंदिन व्यवहारांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा फटका बसला होता. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत जवळपास तीन तास वीज नव्हती. गेल्या दशकभरात मुंबईत इतक्या दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होण्याची ही चौथी वेळ आहे. आगामी काळात असे प्रकार घडणार नाहीत, यादृष्टीने आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी काय काय सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबतच्या पर्यायांवर आता नव्याने चर्चाही सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या:
‘बत्ती गुल’ होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री, तर जबाबदारी कशी टाळाल? राम कदमांचा सवाल
Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल
मुंबई-ठाण्यात वीजेचा ब्रेकडाऊन होणं ही शरमेची बाब; माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर हल्लाबोल
(Mumbai Power cut action will be taken says Nitin Raut)