Mumbai COVID-19 Vaccination center | मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस मिळणार, पाहा यादी
मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. (Mumbai Private COVID-19 Vaccination Centre)
मुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona vaccination) दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला. या लसीकरणासाठी राज्य सरकारनेसुद्धा कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्याची परवानगी दिली आहे. नुकतंच केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश आहेत. यानुसार मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. (Mumbai Private COVID-19 Vaccination Centre Second Phase Corona Vaccination)
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. नुकतंच मुंबई महापालिकेने याबाबची यादी जारी केली आहे. या यादीत रुग्णालयांची नावे देण्यात आली आहे.
मुंबईत ‘या’ रुग्णालयात मिळणार कोरोना लस
- शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी
- के. जे. सोमय्या रुग्णालय
- डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय
- वॉकहार्ट रुग्णालय
- सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय
- सैफी रुग्णालय
- पी. डी. हिंदुजा रुग्णालय
- डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय
- कौशल्य मेडिकल फाऊंडेशन
- मसीना रुग्णालय
- हॉली फॅमिली रुग्णालय
- एस. एल. रहेजा रुग्णालय
- लिलावती रुग्णालय
- गुरु नानक रुग्णालय
- बॉम्बे रुग्णालय
- ब्रीच कँडी रुग्णालय
- फोर्टिस, मुलुंड
- द भाटिया जनरल रुग्णालय
- ग्लोबल रुग्णालय
- सर्वोदय रुग्णालय
- जसलोक रुग्णालय
- करुणा रुग्णालय
- एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय
- SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय
- कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय
- कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय
- सुरुणा शेठिया रुग्णालय
- हॉली स्पिरीट रुग्णालय
- टाटा रुग्णालय
(Mumbai Private COVID-19 Vaccination Centre Second Phase Corona Vaccination)
Gearing Up The Drive!
In addition to BMC centres, 29 pvt. hosp. in Mumbai have been given permissions to carry out COVID Vaccination Drive.
These 29 hospitals fulfil all criteria prescribed by GoI to be designated as COVID Vaccination Centre (CVC).#MyBMCUpdates#NaToCorona pic.twitter.com/NRXom6glox
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 2, 2021
खासगी रुग्णालयात 250 रुपये प्रतिडोस आकारणार
दरम्यान कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरणाचा दुसरा टप्पा राबवला जात आहे. या टप्प्यात 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल. तसेच 60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य केले जाणार आहे. तर खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी प्रत्येक डोससाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
महापालिकेची कोविड लसीकरण केंद्र
१. बी.के.सी जंबो रुग्णालय, वांद्रे
२. मुलुंड जंबो कोविड रुग्णालय, मुलुंड
३. नेस्को जंबो कोविड रुग्णालय, गोरेगाव
४. सेवन हिल्स रुग्णालय, अंधेरी
५. दहीसर जंबो रुग्णालय, दहीसर
60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल तर तर ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.
‘हे’ कागदपत्रे लागतील
कोरोना लसीसाठी आधार नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड, मनरेगा ज़ब कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेन्शन डॉक्युमेंट, MP/MLA/MLA चं आयडी कार्ड, सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस आयडी कार्ड, नॅशनल पोप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड यापैकी कोणतीही माहिती तुम्ही दाखवू शकता. (Mumbai Private COVID-19 Vaccination Centre Second Phase Corona Vaccination)
संबंधित बातम्या :
Co-Win registration : कोरोना लसीसाठी को विन अॅपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया