Mumbai Pune Corona Report : मुंबई, पुण्यात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ, लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या!

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 712 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुण्यात दिवसभरात 1 हजार 82 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Mumbai Pune Corona Report : मुंबई, पुण्यात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ, लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या!
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 9:26 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्ही शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून काही निर्बंधही लावण्यात आले आहेत.(Corona situation in Mumbai and Pune, possibility of lockdown)

मुंबईतील कोरोनाची स्थिती काय?

मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 712 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 63 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवसभरात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 3 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबई जिल्ह्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 92 टक्क्यांवर आहे. 8 मार्च ते 14 मार्च दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.42 टक्के राहिला आहे. सध्या मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन 32 आहेत. हे झोन झोपडपट्ट्या आणि चाळीतील असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 217 आहे.

मुंबईत निर्बंधांची शक्यता

मुंबईत सध्या सार्वजनिक वाहतूक सुरु झाली आहे. त्यातच अनलॉकमुळे सर्व काही सुरळीत पूर्वीप्रमाणे सुरु आहे. पण याकाळात अनेक जण मास्क सॅनिटायझरचा वापर करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे मुंबईत निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील कोरोनाची स्थिती

दिवसभरात 678 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पुण्यात आज 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकजण पुण्याबाहेरील आहे. पुण्यात सध्या 370 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण आकडेवारीचा विचार केला तर पुण्यात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 285 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 2 लाख 2 हजार 339 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 11 हजार 984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेयत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.

पुण्यात काय सुरु, काय बंद?

?पुण्यात लॉकडाऊन नाही

?पुणे शहरात रात्रीची संचारबंदी

?पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू

?लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी

?31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

?हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार

?उद्यान एकवेळ बंद राहणार

संबंधित बातम्या :

Aurangabad Lockdown : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

कोरोना संसर्गानंतरही शूटिंगमध्ये सहभागी, बॉलिवूड अभिनेत्रीवर गुन्हा

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात दरदिवशी कोरोनाचा स्फोट, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांची स्थिती काय?

Corona situation in Mumbai and Pune, possibility of lockdown

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.