Mumbai pune Corona Report : मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, पुण्याच्या विभागीय आयुक्तांनाही कोरोना

मुंबई आणि पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला तर सोमवारपेक्षा आज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Mumbai pune Corona Report : मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, पुण्याच्या विभागीय आयुक्तांनाही कोरोना
corona viएकूणच दम्याची औषधं कोरोनाची लक्षणं कमी करण्यास मदत करत असल्याने दम्याच्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा कमी असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.rus
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 9:33 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण, राज्यातील मोठ्या शहरांची आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. मुंबई आणि पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला तर सोमवारपेक्षा आज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.(Large increase in the number of corona patients in Mumbai and Pune in the last 24 hours)

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबई गेल्या 24 तासांत 1 हजार 922 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 236 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 2 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या एकूण 15 हजार 263 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारची आकडेवारी पाहिली तर मुंबईत 1 हजार 712 नवे रुग्ण आढळून आले होते.

मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. 9 मार्च ते 15 मार्चपर्यंत मुंबईत एकूण कोविड वाढीचा दर 0.45 टक्के राहिला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 156 दिवस असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात दिवसभरात 1 हजार 925 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात पुण्यात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात सध्या 394 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील कोरोनारुग्णांची एकूण संख्या 2 लाख 21 हजार 210 झाली आहे. त्यातील 2 लाख 3 हजार 16 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत एकूण 4 हजार 969 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटिव्ह

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेली वर्षभर सौरभ राव यांनी कोरोनाशी लढण्यासाठी रणनिती आखली. पण अखेर आज त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सौरभ राव हे शुक्रवारी विधानभवनात अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले होते. सौरभ राव यांची कोरोना चाचणी केल्यानंतर आज दुपारी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं. त्यामुळे सौरभ राव यांच्यासोबत असलेले अनेक अधिकारी आता विलगीकरणात गेले आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोनाचा पॉझिटिव्ह, शुक्रवारी अजितदादांच्या बैठकीला उपस्थित!

Mumbai Pune Corona Report : मुंबई, पुण्यात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ, लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या!

Large increase in the number of corona patients in Mumbai and Pune in the last 24 hours

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.