वेगवान चालकांसाठी आरटीओचा धडा, शपथ घेताच मोबाईलवर मिळणार सर्टीफिकेट्स
सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने वाहनधारकांचे समुपदेशन करावे अशा सूचना केल्या होत्या, त्याचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यासाठी खालापूर आणि उरसे या टोलनाक्यावर समुपनकेंद्र स्थापन केली आहेत.
मुंबई : मुंबई-पुणे या ( mumbai-pune) दोन्ही महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे परीवहन विभागाने (transport department ) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-pune e-way ) आणि जुना हायवे दाेन्ही ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच त्यांना शिस्त लावण्यासाठी 1 डिसेंबरपासून मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेत 8 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांचे काऊन्सिलींग केले जाणार आहे. त्यांना वेगाने वाहन चालविल्याने होणाऱ्या अपघातांच्या चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्याकडून रस्ता सुरक्षा विषयीची प्रश्नावली सोडवून घेतली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ द्यावी लागणार आहे. ही शपथ घेताच त्यांना मोबाईल सर्टीफीकेट्स मिळणार आहे.
रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अंमलबजावणी उपक्रमांर्तगत सहा महिन्यांसाठी ही 24 तास सुरक्षा मोहीम राबविली जाणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रांचे (ब्लॅक स्पॉट) सर्व्हेक्षण करणे, उपाय योजना करणे, चालकांसाठी तेथे घडलेल्या अपघातांची माहिती तसेच आकडेवारी दर्शविणारे फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ही सावधान करणारी सूचना पाहून तरी वाहन चालकांना शिस्त लागावी असा हेतू आहे.
या मोहिमेत अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यासाठी खालापूर आणि उरसे या टोलनाक्यावर समुपनकेंद्र स्थापन झाली आहेत. अशा चालकांना या समुपदेशन केंद्रावर अतिवेगाने वाहन चालविण्याचे दुष्परिणाम काय होतात ? याबाबत चित्रफित दाखविण्यात येणार असुन त्या चालकांना रस्ता सुरक्षा विषयीची प्रश्नावली सोडवावी लागणार आहे आणि त्यानंतर वाहतुक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे.
परीवहन विभागाने एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केले असून त्याचा ‘क्युआर कोड’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिने स्वतः च्या मोबाईलने हा ‘क्युआर कोड’ स्कॅन केल्यावर प्रश्नावली आणि शपथ मोबाईलवर उपलब्ध होणार असून प्रश्नावली सोडवल्यानंतर गुणपत्रिका आणि शपथ घेतल्यानंतर शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र लगेच मोबाईलवर मिळणार आहे.
मुंबई ते पुणे नविन द्रुतगती मार्ग आणि जुना अशा दोन्ही महामार्गांवर वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाढत्या अपघाताची संख्या कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने व्यापक मोहिम सुरू केली आहे. रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अंमलबजावणी उपक्रमांर्तगत सहा महिन्यांसाठी ही 24 तास सुरक्षा मोहीम राबविली जाणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे.
अपघातप्रवण क्षेत्रांचे ( ब्लॅक स्पॉट ) सर्व्हेक्षण करणे, उपाय योजना करणे, चालकांसाठी तेथे घडलेल्या अपघातांची माहिती तसेच आकडेवारी दर्शविणारे फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ही सावधान करणारी सूचना पाहून तरी वाहन चालकांना शिस्त लागावी असा हेतू आहे. सगळ्या वाहन चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापुढे सुध्दा या सर्व चालकांची जनजागृती करण्यात येणार आहे.
रस्त्यावर पार्कींग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे, उजव्या मार्गिकेत धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करणे, रस्त्यावर वाहतूकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे, टोलनाक्यांवर उद्घोषणेद्वारे जनजागृती आदी उपाय करण्यात येणार आहे. आरटीओच्या इंटरसेप्टर गस्तीवाहनांद्वारे अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, चुकीच्या पद्धतीने लेन कटींग करणाऱ्यांवर कारवाई करणे, विना हेल्मेट तसेच विनासिटबेल्ट प्रवाशांवर कारवाई करणे अशाप्रकारे कारवाई केली जाणार आहे.
सुरूवातीचे सात दिवस दोन्ही महामार्गाच्या टोल नाक्यांवर वाहनांतील पीए सिस्टीमद्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आता प्रत्यक्षात दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची 12 पथकांची निर्मिती केली आहे. या पथकात 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यातील सहा पथके आणि 15 अधिकारी या दोन्ही महामार्गावर 24 तास कार्यरत राहणार असल्याचे परिवहन उपायुक्त रस्ता (सुरक्षा कक्ष ) भरत कळसकर यांनी टीव्ही नाइन मराठी बेवसाइटशी बोलताना सांगितले.