Mumbai Rain Update : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, लोकल, रस्ते वाहतुकीची सध्या स्थिती काय? जाणून घ्या

Mumbai Rain Update : मुंबईत एक तास जरी मुसळधार पाऊस कोसळला, तरी लगेच आपल्याला परिणाम दिसून येतो. आजही तेच चित्र आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे लोकल, रस्ते वाहतुकीची सध्या काय स्थिती आहे, जाणून घ्या.

Mumbai Rain Update : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, लोकल, रस्ते वाहतुकीची सध्या स्थिती काय? जाणून घ्या
mumbai rain
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 8:40 AM

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. मुंबईत एक तास जरी मुसळधार पाऊस कोसळला, तरी लगेच आपल्याला परिणाम दिसून येतो. आजही तेच चित्र आहे. तासाभराच्या पावसाने सुद्धा मुंबईची व्यवस्था कोलमडते. मागच्या काही दिवसात हे दिसून आलय. लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे.

दररोज लाखो लोक मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेने प्रवास करतात. मागच्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत. सकाळी कामावर निघण्याच्यावेळी पावसाचा जोर वाढतो, त्यामुळे कार्यालय गाठायला विलंब होतो. मुंबईत कर्जत, कसाराच नाही, तर पुण्यावरुनही रोज नोकरीसाठी येणारे लोक आहेत.

मुंबईत शहर आणि उपनगरात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत.

पश्चिम रेल्वे 5 ते 6 मिनिट विलंबाने धावत आहे.

हार्बर रेल्वे सुद्धा 5 ते 6 मिनिट उशिराने धावत आहे.

सध्या कुठल्याही रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचलेलं नाहीय. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरु आहे. फक्त काही मिनिट उशिराने लोकल पळतायत.

कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत असल्याने कल्याण स्थानकात चाकरमनी आणि प्रवशांची गर्दी

पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांमुळे सिग्नल मिळत नसल्याने लोकल ट्रेनला उशीर.

अंधेरी सबवे सुरू आहे.

कुठे पाणी साचलं 

दादर पूर्वे रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचलय.

माटुंगा-सायन किंग्ज सर्कल गांधी मार्केट परिसरात पाणी साचलय.

हवामान विभागाने मुंबईसाठी आज यलो अलर्ट दिलाय. काही भागात मुसळधार पाऊस कोसळू शकतो.

भारतीय हवामान विभागाच्या (आईएमडी) माहितीनुसार मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहरात आज किमान तापमान 24.99 अंश सेल्सियस नोंदवले जाईल. तर कमाल तापमान 26.44 अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे.

राज्यात कोकणात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुढील २० तारखेपर्यंत कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाचा परिणाम पश्चिम द्रुतगती महामार्गावरही दिसून येत आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी गोरेगाव अंधेरी येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

वाहने संथ गतीने पुढे जात असून काळ्याकुट्ट ढगांमुळे सकाळचे साडेआठ वाजले असले तरी सर्व वाहनांचे हेडलाइट सुरू आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.