Mumbai rain update | मुंबई, पुणे, पालघरला कुठला अलर्ट दिलाय? मुंबईत आतापर्यंत किती पाऊस झालाय? जाणून घ्या डिटेल्स

Mumbai rain update | राज्याच्या सर्व भागांसाठी हवामान विभागाने कुठला अलर्ट जारी केलाय? औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, सिंधुदुर्गमध्ये कशी असेल स्थिती जाणून घ्या सविस्तर.

Mumbai rain update | मुंबई, पुणे, पालघरला कुठला अलर्ट दिलाय? मुंबईत आतापर्यंत किती पाऊस झालाय? जाणून घ्या डिटेल्स
Maharashtra Rain update
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 10:47 AM

मुंबई : कोकण आणि मुंबई पट्ट्यात पावसाने जोर पकडलाय. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. अजूनपर्यंत तरी, सर्व काही सुरळीत सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक कोलमडल्यास मुंबईच्या वेगाला ब्रेक लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने बुधवारसाठी मुंबई शहर आणि उपनगरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या काही भागात आज पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पुढच्या 3 ते 4 तासात सिंधूदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

ठाणे, रायगडमध्ये कसा होईल पाऊस?

हे सुद्धा वाचा

ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुण्यासाठी कुठला अलर्ट?

हवामान विभागाने रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. इथे काही भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. ठाणे, रत्नागिरी आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

कुठे जाहीर झाली सुट्टी?

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस बंद राहणार असल्याच त्यांनी म्हटलय.

किमी मिमी पाऊस झाल्यानंतर अलर्ट दिला जातो?

दिवसभरात 115.6 mm ते 204.4 mm पाऊस झाल्यानंतर ऑरेंज अलर्ट दिला जातो. दिवसभरात 204.5 mm च्या पुढे पाऊस झाल्यास रेड अलर्ट दिला जातो.

मुंबईत 24 तासात किती पाऊस झालाय?

औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागच्या 24 तासात मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 47.42mm , 50.04 mm आणि 50.99mm पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनला अनुकूल स्थिती आहे. ही स्थिती किनाऱ्याच्या दिशेने सरकू लागेल, तेव्हा मुंबई आणि कोकण पट्टयात मुसळधार पाऊस होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.