AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.

मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
mumbai rain
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 9:27 AM

Mumbai Rains Update : गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.

सखल भागात पाणी साचायला सुरुवात

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. मुंबईतील दादर, लालबाग, परेल, हिंदमाता, चर्चगेट, सीएसटी या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. मुंबईतील अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ, खार, मालाड या भागात दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे सायन, किंग्ज सर्कल, दादर टीटी, हिंदमाता या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंधेरी, मालाड या ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला. सध्या पाण्याचे निचरा करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्यांनी लोकलला सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या मुसळधार पाऊस असल्याने मुंबई लोकल उशिराने धावत आहेत. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. कर्जतहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सध्या उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

पश्चिम रेल्वेही उशिराने

मुंबईत सध्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. तर हार्बर रेल्वेही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

तसेच या मुसळधार पावसाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला आहे. मुंबईतून येणारी आणि जाणारी विमाने उशिराने सुरु असल्याने प्रवाशी त्रस्त झाल्याचे दिसत आहेत.

मुंबईसह कोकणाला ऑरेंज अर्लट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.