Mumbai Corona : मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढ, तिसऱ्या लाटेचं संकट? रुग्ण नेमके कुठं वाढले, BMC नं दिली माहिती

मुंबईतल्या (Mumbai Corona Update) रुग्णसंख्येचा अभ्यास केला असता बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू इमारती आणि वस्तीमधील असल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागकडून ही माहिती देण्यात आलीय.

Mumbai Corona : मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढ, तिसऱ्या लाटेचं संकट? रुग्ण नेमके कुठं वाढले, BMC नं दिली माहिती
अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले 1 कोटी खर्च
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 9:39 AM

मुंबई: महाराष्ट्रात शुक्रवारी 8067 नव्या कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Omicron News live) नोंद झाली. सर्वाधिक रुग्णांची संख्या मुंबईत आढळून आली आहे. मुंबईत 5428 रुग्ण आढळून आले आहेत.मुंबईतल्या (Mumbai Corona Update) रुग्णसंख्येचा अभ्यास केला असता बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू इमारती आणि वस्तीमधील असल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागकडून ही माहिती देण्यात आलीय. ए विभागातील कुलाबा-फोर्ट, डी विभागातील ग्रॅण्ट रोड-गिरगाव परिसर, अंधेरी पूर्व पश्चिम. आणि वांद्रे पूर्व पश्चिम भागातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं समोर आलंय.

महापालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील रुग्णसंख्या 100 पर्यंत खाली आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागलीय. मुंबईतील रुग्णसंख्येनं 5 हजारांचा टप्पा देखील पार केलाय. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्ती आणि इमारतीमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परदेशातून केलेला प्रवास, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याच समोर आलं आहे.

मुंबईतील गेल्या काही दिवसातील रुग्णसंख्या

31 डिसेंबर – 5428 30 डिसेंबर – 3671 29 डिसेंबर – 2510 28 डिसेंबर – 1377 27 डिसेंबर – 809 26 डिसेंबर – 922 25 डिसेंबर – 757 24 डिसेंबर – 683 23 डिसेंबर – 602 22 डिसेंबर – 490 21 डिसेंबर – 327

कुलाबा-फोर्ट, डी विभागातील ग्रॅण्ट रोड-गिरगाव परिसर, अंधेरी पूर्व पश्चिम. आणि वांद्रे पूर्व पश्चिम भागातील रुग्णसंख्येत 10 पट वाढ झाल्याचं समोर आलंय.

संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन

कोरोना रुग्णसंख्या वाढलेल्या इमारतींमध्ये कामासाठी येणाऱ्या घरकामगार, चालक आणि वॉचमन यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असं आवाहन करण्यात आलंय. एखाद्या व्यक्तीचा अहवाल बाधित आल्यास त्याला क्वारंटाईन करावं. दिवसातून चार ते पाच वेळा सॅनिटायझेशन करावं. सार्वजनिक गर्दीच्या कार्यक्रमांना टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 454 वर

महाराष्ट्रात ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 454 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 157 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.

इतर बातम्या:

Mumbai New Year | अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क, दिंडोशी भागात ड्रिंक अँड ड्राईव्हचे एकही प्रकरण नाही

Mumbai Corona Update : मुंबईकरांची झोप उडणार? एका दिवसात कोरोनाचे तब्बल 5 हजार 428 नवे रुग्ण! ओमिक्रॉनबाबत मात्र दिलासा

Mumbai record highest corona cases in last few days BMC gave information high profile areas in mumbai witness corona cases hike

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.