थोडी तरी शरम ठेवावी, तुम्ही रावण…; संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिंदे गटातील आमदारची जीभ घसरली
संजय राऊत टीका करण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये!. असा घणाघात शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. थोडी तरी शरम ठेवावी, तुम्ही रावण..., असं म्हणत शिंदे गटातील नेत्यानं संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय. दसरा मेळाव्यावर बोलताना शिंदे गटातील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. संजय राऊत हा स्वतः न#@! आहे. आमच्या इथे सगळे वाघ आहेत. त्यांची डरकाळी आहे आणि या वाघांनी तुमच्या छाताडावर बसून कसा नाच केलाय. ते उभ्या महाराष्ट्र आणि देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे न@#! टिका करू नये, संजय राऊत न#@!, बा#@! आहे, असं म्हणत संजय गायकवाड यांनी टीकास्त्र केली आहे.
संजय राऊत यांना लाज शरम काही राहिलेली नाही. त्यांनी थोडी तरी शरम ठेवावी. तुम्ही रावण झाले आहात. तुमचाच वध होईल. तुम्ही रावणाच्या तोंडाप्रमाणे इतर पक्षांची तोंड लावून घेतलेली आहेत. काँग्रेस आणि समाजवादी ही सगळी रावेणाची तोंडं आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही आहात. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तुमच्यावर ब्रम्हास्त्र सोडणार आहेत, असं म्हणत संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
तर शिंदे गटाचे नेते, शंभुराज देसाई यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत टीका करण्याच्या लायकीचे नाहीत. संजय राऊतच जास्त कांदे खातात. आम्ही कुणावर टीका करत नाही. शिवाजी पार्कवर आज फक्त टीका-टोमणे ऐकायला मिळतील. आम्ही फक्त विकासाचं राजकारण करतो. शिवाजी पार्कवरचा मेळावा ही सगळी बोगसगिरी आहे.
मराठा आरक्षणाप्रश्नी एवढंच सांगायचंय की सरकार टिकणारं आरक्षण देणार आहे. समाजाचं भलं व्हावं ही आमचीही इच्छा आहे.जरांगे पाटलांनी समजून घ्यावं. प्रत्येकाचं वेगळं मत आहे. आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे त्यांनी धीर धरावा. आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं हवं, तेच देण्याचा सरकार प्रयत्न करतंय, असं शंभूराज देसाई म्हणालेत.
संजय राऊत यांना कामधंदे राहिलेला नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांना आपण देव मानतो त्यांचे फोटो लावतो. मग बाळासाहेबांचे फोटो आम्हीही लावले. त्यात चूक काय? संजय राऊत पुढच्या वेळी खासदार होणार नाहीत, हे निश्चित आहे, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.