5 दिवसांची मेहनत अन् 10 लाख वाया, ‘याची’ काय गरज होती; संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना थेट सवाल

Sanjay Raut on PM Narendra Modi Nashik Kalaram Mandir Visit and Cleaning : पंतप्रधान मोदीजी, याची काय गरज होती?; संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? मोदींना कोणता सवाल केला? वाचा सविस्तर...

5 दिवसांची मेहनत अन् 10 लाख वाया, 'याची' काय गरज होती; संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना थेट सवाल
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 12:28 PM

मुंबई | 13 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्याआधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात साफसफाई केली. यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. या साफसफाईचा काय फायदा, असं थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ट्विटमधून संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे.

ट्विटमध्ये राऊत काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात साफसफाई केली. यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान दौऱ्यावर येणार यासाठी राज्य सरकारकडून सफाई करण्यात आली. या स्वच्छतेसाठी 5 दिवस काम केलं गेलं. 8 ते 10 लाख रूपयांचा खर्च झाला. पण मग मोदींनी मंदिर परिसरात सफाई का केली? त्यांच्या या कृतीने 5 दिवसांची मेहनत अन् 10-12 लाख वाया गेले, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊत यांचं ट्विट जसंच्या तसं

आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला.. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते.त्यांनी मंदिर एकदम चका चक केले..या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले.

मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते.अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते.तरीही आपल्या पंत प्रधान महोदयांनी हाती mop घेऊन सफाई दर्शन केलेच!याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाई वर खर्च केलेले 10 12 लाख रुपये वाया गेले…

संजय राऊत यांनी ट्विट करत पंतप्रधानांना आणखी एक सवाल केला आहे. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत?, असा प्रश्न संजय राऊत यांनी मोदींना विचारला आहे.

राऊतांचं ट्विट

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं .

नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय.

पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत?

राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत.

भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.