पुढच्या दोन दिवसात महायुतीचं जागावाटप होणार; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
MLA Sanjay Shirsat on Mahayuti Space Allocation Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अन् जागावाटप...; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. कधी होणार जागावाटप? वाचा सविस्तर...
सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 05 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा कधीही होऊ शकते. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार? याची चर्चा होतेय. महायुतीच्या जागावाटपावर शिंदे गटाच्या नेत्यानं महत्वाचं विधान केलंय. महायुतीचं जागावाटप कधी होणार यावर भाष्य केलंय. दोन दिवसात आमचं जागावाटप झालेलं दिसेल. त्या वेळेला विरोधकांचे सगळे जुने सर्वे तोंडाशी पडतील, असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करतील, असं संजय शिरसाट म्हणाले.
“लवकरच यादी जाहीर करणार”
अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव इतर ठिकाणी पक्षाच्या बैठकीचा भाग आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा होील. मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेटणार आहेत. महायुतीची चर्चा नाही. आमची युती कुठपर्यंत आली, याचा अहवाल अमित शाह यांना देण्यात येणार आहे. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. एक दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर करतील, असं संजय शिरसाट म्हणाले.
आमचं सगळं ठरलंय- शिरसाट
महायुतीचे उमेदवार ठरलेले आहेत. जागा वाटपाची गणितं सुद्धा ठरलेली आहेत. एक-दोन जागेवर बदलीचा उमेदवार कोण द्यायचा यासाठी थांबलेलं आहे. आघाडीकडे उमेदवार नाही. त्यांना उमेदवार मिळत नाही. म्हणून त्यांनी त्यांची जागा डिक्लेअर केलेल्या नाहीत. कधी वंचित बरोबर जाणार म्हणतात कधी नाही जाणार म्हणतात… मात्र आघाडीची युती होणार नाही. महायुतीची युती होईल मात्र आघाडीचे होणार नाही असं स्पष्ट दिसतं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पक्षाच्या तर्फे एकत्र बसून निर्णय घेतील. ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान्य असेल, असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचना देऊन हैदराबादला गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या परवगी शिवाय ते जात नाहीत. त्यांनी घेतलेली परवानगी ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती. कुठलाही वाद तिकडे घडला नाही, असंही शिरसाट म्हणाले.