Neil Somaiya : नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण, मुंबई सत्र न्यायालयात उद्या निकाल,दिलासा मिळणार?
नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावार सुनावणी पूर्ण झाली आहे. नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर होणार का याचा निर्णय उद्या जाहीर होणार आहे. या निर्णयाकडे किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि भाजपसह शिवसेनेचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. जम्बो कोविड सेंटरची कंत्राट संजय राऊत (Sanjay Raut ) यांच्या नजीकच्या व्यक्तींना देण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya ) आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा करत आरोप केला होता. यानंतर संजय राऊत यांनी बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असं म्हटलं होतं. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावार सुनावणी पूर्ण झाली आहे. नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर होणार का याचा निर्णय उद्या जाहीर होणार आहे. या निर्णयाकडे किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि भाजपसह शिवसेनेचं लक्ष लागलं आहे.
नील सोमय्यांच्या जामीन अर्ज
भाजप नेते किरीट सोमय्या याचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्या समोर ही सुनावणी पूर्ण झाली. उद्या 1 मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालय यासंदर्भात निर्णय सुनावणार आहे. ज्येष्ठ वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी नील सोमय्या यांच्यासाठी युक्तिवाद केला.
संजय राऊतांचे आरोप, नील सोमय्यांची कोर्टात धाव
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावेळी किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांचा मुद्दा पुढं आणला होता. नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. नील सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्या प्रकरणाची कागदपत्रं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. “बाप बेटे जेल जाएंगे”, संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘निकॉन इन्फ्रा’ च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई सत्र न्यायालय आता नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काय निर्णययय घेणार हे पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या :
नाशिकमधील मार्गाला महापालिकेकडून भांतबरेकर यांचे नाव; संगीत क्षेत्रातील मानबिंदूचा अनोखा गौरव!