धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप, शिवसेनेची नितेश राणेंविरोधात पोलिसात तक्रार

| Updated on: Dec 23, 2021 | 9:06 AM

शिवसेना आणि नितेश राणे यांच्यामधील वाद हा काही नवा नाहीये. नितेश राणे यांचे एक ट्विट पुन्हा एकदा वादाचे कारण झाले आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असे ट्विट केल्यावरुन शिवसैनिकांनी नितेश राणे विरोधात पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप, शिवसेनेची नितेश राणेंविरोधात पोलिसात तक्रार
नितेश राणे, आमदार
Follow us on

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामधील वाद हा काही नवा नाहीये. नितेश राणे यांचे एक ट्विट पुन्हा एकदा वादाचे कारण झाले आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असे ट्विट केल्यावरुन शिवसैनिकांनी नितेश राणेंविरोधात पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

नितेश राणेंच्या विरोधात सेना आक्रमक

काळाचौकी आणि भायखळा पोलिस स्टेशनमध्ये नितेश राणेंविरोधात तक्रारीचे पत्र शिवसैनिकांनी दिले आहे. तर भायखळा शिवडी, काळाचौकी वरळी येथे नितेश राणे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी सेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही तक्रार दिली आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. असे चूकीचे ट्विट केल्यावरुन तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असे ट्विट केल्यावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 नितेश राणे यांची टीका

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली, त्यानंतर भाजपही जोरदार आक्रमक झाले आहे. आधी देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधव यांच्यावर विधानसभेत हल्लाबोल चढवला आणि त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर खरपूस टीका केली आहे.

संबंधित बातम्या : 

Muslim Reservation : 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा पाठपुरावा करा, नसीम खान यांचं बाळासाहेब थोरातांना पत्र

Winter Session : ठाकरे सरकारचा विधानसभेत आज पुन्हा असंविधानिक निर्णय, आशिष शेलारांचा आरोप