AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या संगतीला गेले, तसे त्यांचे…; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

Sushma Andhare on Shivsena Shinde Group Leaders : उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी शिंदे गटाच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

भाजपच्या संगतीला गेले, तसे त्यांचे...; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
| Updated on: Jul 27, 2024 | 5:58 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. हे लोक आपल्या सोबत होते. तेव्हा चांगले होते. मात्र झालं असं की ढवळ्यासोबत पवळ्या बांधला. वान नाही पण गुण लागला… हे भाजपच्या संगतीला गेले, तसे त्यांचे संगीत गुण बदलले. त्यामुळे त्यांचे गुण घेतले त्यांच्यावर काय बोलणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटानेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.

शिंदे गटावर टीका

एक उत्तम वाजंत्री असतो ना तो मड्यालाही वाजवतो आणि लग्नातही वाजवतो, फक्त एक नियम, मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवायचे नसते. एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीकडे किंवा त्यांच्या लोकांकडे संस्कार असतील. तर एखादा शत्रू जरी असला तरी त्याला आपण शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या दिवशी तो सुखाचा असतो. त्यादिवशी सदिच्छा द्याव्यात असा आपल्यावर संस्कार आहेत. आज त्या 40 जणांच्या उद्धारकर्त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी ऋणनिर्देश दिन म्हणून ऋण मानावेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

उद्धव ठाकरेंना वडिलांचा विसर पडलाय, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली. यालाही सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. हे कुणी सांगावं? शिंदेंनी? त्यांना स्वतःच्या वडील संभाजीराव यांचे नाव लावण्यात संकोच वाटतो. त्यांचा फोटो लावण्यात संकोच वाटतो. म्हणून उद्धवसाहेबांच्या वडिलांचा फोटो लावतात. आपला बाप द्यायचा सोडून आणि दुसऱ्याचा पाहिजे… तुमच्या वडिलांचा फोटो लावा ना. त्यांचा गवगवा करा ना…, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.

अमित शाहांच्या टीकेला प्रत्युत्तर

अमित शाह यांनी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष आहेत, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या या टीकेला अंधारेंनी प्रतिक्रिया दिलीय. ज्याच्या अंगावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत. अश्या गुजरातच्या तडीपार गुंडांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आम्ही काय आहोत आम्हाला माहिती, गुजरातच्या तडीपारने आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.