Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : …अन्यथा 15 सप्टेंबरपासून टॅक्सी चालकांसह रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार! मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

Mumbai Taxi Drivers Strike News : 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जावू, असा इशारा टॅक्सी चालक संघटनांनी दिला आहे. या संपामध्ये काही रिक्षा चालक संघटनाही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून टॅक्सी सोबतच रिक्षा चालक संपावर गेल्यास मुंबईकरांचे हाल होऊ शकतात.

Mumbai : ...अन्यथा 15 सप्टेंबरपासून टॅक्सी चालकांसह रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार! मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
टॅक्सीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 8:42 AM

मुंबई : मुंबईकरांची (Mumbai News) येत्या 15 सप्टेंबरपासून मोठी कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. कारण टॅक्सी संघटनेने (Taxi Unions) 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. भाडेवाढीची मागणी टॅक्सी चालक संघटनांनी केली होती. याबाबत रविवारी एक बैठक पार पडली. भाडेवाढीची मागणी जर मान्य केली नाही, तर 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (Auto Rikshaw Taxi Strike News) जावू, असा इशारा टॅक्सी चालक संघटनांनी दिला आहे. या संपामध्ये काही रिक्षा चालक संघटनाही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून टॅक्सी सोबतच रिक्षा चालक संपावर गेल्यास मुंबईकरांचे हाल होऊ शकतात.

पाहा व्हिडीओ :

महागाईमुळे दररोज टॅक्सी चालकांचं दोनशे रुपयांचं नुकसान होतंय. दोन आठवड्यांपूर्वी भाडेवाढीचं आश्वासन आम्हाला मिळालं होतं. पण भाडेवाढ करण्याची कोणतीही घोषणा अद्याप झाली नाही. त्यामुळे अखेर आता आम्ही संपावर जाण्याच्या निर्णयपर्यंत आलो आहोत, असं टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साांगितलं. 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला असल्याचं ए.एल.कार्दोस या मुंबईतील सगळ्यात मोठ्या टॅक्सी चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, याआधी रिक्षा चालक संघटनांनी सीएनजीमध्ये सबसिडी मिळावी, अशी मागणी केली होती. पण आता रिक्षा चालक संघटनांकडूनही दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा चालकही टॅक्सी चालकांच्या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. रिक्षा चालकांच्या मागण्या घेऊन रिक्षा चालक संघटनेची एक कृती समिती सरकारची भेट घेणार आहे. मंगळवारी याबाबत सरकारसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

भाडेवाढीची मागणी जर मान्य झाली नाही, तर 15 सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी चालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला. त्यामुळे आता टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक संघटनांच्या मागण्यांबाबत काय निर्णय सरकार दरबारी घेतला जातो, याकडे सर्वसामान्य रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांचं लक्ष लागलंय.

"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.