Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटचे गुड मॉर्निंग, कोरोनाने निधनापूर्वी मुंबईतील महिला डॉक्टरची फेसबुक पोस्ट

कोरोनावरील उपचार सुरु असतानाच डॉ. मनिषा जाधव यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती (Dr Manisha Jadhav Dies of Corona )

शेवटचे गुड मॉर्निंग, कोरोनाने निधनापूर्वी मुंबईतील महिला डॉक्टरची फेसबुक पोस्ट
डॉ. मनिषा जाधव
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 12:02 PM

मुंबई : शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव (Dr Manisha Jadhav) यांचे कोरोनामुळे निधन झाले. डॉ. जाधव यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी, कारण अखेरचा श्वास घेण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित तसे संकेत दिले होते. ‘कदाचित शेवटचे गुड मॉर्निंग’ असं लिहित डॉ. मनिषा जाधव यांनी आपल्या निधनाचं भाकितच वर्तवलं होतं. (Mumbai TB Hospital Dr Manisha Jadhav Dies of Corona bids adieu in Last Facebook Post)

डॉ. मनिषा जाधव यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे 12 एप्रिलला त्यांना कांदिवलीतील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 52 वर्षांच्या होत्या. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात सेवा दिली होती.

कांदिवलीतील रुग्णालयात अखेरचा श्वास

डॉ. मनिषा जाधव यांच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात खातेप्रमुख या पदावर कार्यरत आहेत. दैवदुर्विलास म्हणजे याच रुग्णालयात डॉ. मनिषा यांनी प्राण सोडले.

काय होती फेसबुक पोस्ट

कोरोनावरील उपचार सुरु असतानाच डॉ. मनिषा जाधव यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. 18 एप्रिल रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांनी ही पोस्ट लिहिली होती. “कदाचित अखेरचे सुप्रभात, मी पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही. सर्वांनी काळजी घ्या, शरीर नश्वर आहे, मात्र आत्मा नाही. आत्मा अमर असतो” अशी सूचक पोस्ट लिहित त्यांनी आपल्या मृत्यूची पुसटशी कल्पना दिली होती.

May be last Good Morning. I may not meet you here on this plateform. Take care all. Body die. Soul doesnt. Soul is immortal ????

Posted by Manisha Jadhav on Saturday, 17 April 2021

(Dr Manisha Jadhav Dies of Corona) फेसबुक पोस्टवर मित्रांकडून धीर

शनिवारी डॉ. मनिषा जाधव यांची फेसबुक पोस्ट वाचून त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना धीरही दिला होता. ‘काळजी करु नका, आपण लवकर परत याल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीही होणार नाही’ अशा आशयाच्या कमेंट्स करण्यात आल्या होत्या. परंतु सोमवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

महापौरांकडून शोक व्यक्त

दरम्यान, डॉ. मनीषा जाधव क्षय रुग्णालयात मुख्य होत्या. शताब्दी रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, याची आम्हाला जाणीव आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. धोका आता अधिक वाढतोय, महापालिकेसाठी ही दुःखद घटना आहे, आम्ही एका चांगल्या डॉक्टरला गमावले आहे, अशा भावना महापौरांनी व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर पिता पुत्रांचा काही तासाच्या अंतरानं मृत्यू

सासऱ्यांपाठोपाठ पतीचाही कोरोनाने मृत्यू, चीनहून पत्नीचा व्हिडीओ कॉलमधून अखेरचा निरोप

(Mumbai TB Hospital Dr Manisha Jadhav Dies of Corona bids adieu in Last Facebook Post)

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.