मुंबईतील जेजे उड्डाणपुलावर ट्रेलर दुभाजक ओलांडून विजेच्या खांबाला धडकला, अडकलेल्या चालकाला अग्निशमन दलाकडून जीवनदान
मुंबईतील जेजे उड्डाणपुलावर काल रात्री मोठी दुर्घटना घडली. सीएसएमटीहून दादरकडे जाणारा ट्रेलर अनियंत्रितपणे दुभाजक ओलांडून विजेच्या खांबाला धडकला. ही टक्कर एवढी जोरदार होती की ट्रेलरच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातात ट्रेलर चालक ट्रेलरच्या आत अडकला होता. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा पाय आत अडकलेला होता.
मुंबई : मुंबईतील जेजे उड्डाणपुलावर काल रात्री मोठी दुर्घटना घडली. सीएसएमटीहून दादरकडे जाणारा ट्रेलर अनियंत्रितपणे दुभाजक ओलांडून विजेच्या खांबाला धडकला. ही टक्कर एवढी जोरदार होती की ट्रेलरच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
या अपघातात ट्रेलर चालक ट्रेलरच्या आत अडकला होता. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा पाय आत अडकलेला होता. तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते चालकाला प्रोत्साहन देत राहिले. लवकरच अग्निशमन दलाची टीमही पोहोचली आणि ड्रायव्हरला ट्रेलर बाहेर काढण्यात यश आले.
जखमी चालकाला जवळच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मुंबई पोलीस अपघाताचे नेमके कारण काय याचा शोध घेत आहे. तर, अपघातानंतर काही काळासाठी जेजे फ्लायओव्हर बंद ठेवण्यात आला होता.
दादरमध्ये तेजस्विनी बसची ट्रकला धडक
मुंबईतील दादर (Dadar) परिसरात तेजस्विनी बसचा खूप मोठा अपघात (Tejaswini Bus Accident) झाला. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती आहे. मरोळ आगाराची बसमार्ग क्रमांक 22 नंबर बसचा आज सकाळी खूप मोठा अपघात झाला. दादर येथे हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आला आहे. या फुटेजमध्ये हे दिसून येते की हा अपघात किती भीषण होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही बसने समोरील कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.
CCTV VIDEO | तेजस्विनी बसची ट्रकला धडक, दादरमधील भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत कैदhttps://t.co/z4a3QaKQkH#TejaswiniBus #truckandbusaccident #RoadAccident #mumbai #Dadar
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2021
संबंधित बातम्या :
बारामती-इंदापूर रस्त्यावर ट्रॅक्टर-इनोव्हाची जोरदार धडक, अपघातात चिरडून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
खामगावात 3 गाड्या एकमेकींवर आदळल्या, अपघातात तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी