AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Real Estate : माम्मामिय्या! तब्बल 151 कोटी रुपयांना मुंबईत 2 फ्लॅट्सची विक्री, कुणी घेतले माहितीये?

थ्री सिक्सी वेस्ट हा एक आलीशान टॉवर आहे. याच टॉवरमध्ये एका हॉलिवूड अभिनेत्यानंही घर खरेदी केलं होतं. त्याची किंमत 55 कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली होती. 2018 साली घेतलेल्या ड्युप्लेक्ससाठी 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजून हॉलिवूड अभिनेत्याने चार वर्षांपूर्वी घर खरेदी केलं होतं.

Mumbai Real Estate : माम्मामिय्या! तब्बल 151 कोटी रुपयांना मुंबईत 2 फ्लॅट्सची विक्री, कुणी घेतले माहितीये?
वरळीतील थ्री सिक्सी वेस्ट इमारतImage Credit source: instagram
| Updated on: Sep 12, 2022 | 1:41 PM
Share

मुंबई : मुंबईत (Mumbai Real Estate) घर खरेदी करणं म्हणजे काही खायचं काम नाहीच! म्हणूनच मुंबईत जेव्हाही मोठी प्रॉपर्टी डील केली जाते, तेव्हा तिची बातमी झाली नाही तरच नवल. आता मुंबईच्या वरळीत (Worli Tower) तब्बल 151 कोटी रुपयांच्या दोन आलीशान फ्लॅट्सची विक्री करण्यात आलीय. हे आलीशान फ्लॅट्स गुंतवणूक करण्यात माहीर असलेली कंपनी आयजीई (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने (IGD India PVT Ltd) खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोजलेली रक्कम डोळे पांढरे करणारी आहे.

गगनचुंबी टॉवरमध्ये घरखरेदी

थ्री सिक्सी वेस्ट ही मुंबईमधील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या वरळी परिसरातील एक आलिशान गगनचुंबी इमारत आहे. या इमारतीच्या 58व्या आणि 59व्या मजल्यावर सदर फ्लॅट्सची खरेदी करण्यात आली आहे. वरळीच्या ऍनी बेझंट रोडवर दिमाखात उभी असलेली ही इमारत नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

इनडेक्सटॅप डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, थ्री सिक्सी वेस्ट या इमारतीच्या टॉवर बी-मधील 58व्या आणि 59व्या मजल्यावर फ्लॅट्सची विक्री नुकतीच करण्यात आली. या फ्लॅट्सची किंमत, त्याची जागा आणि स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन किती होतं, याचीही माहिती समोर आलीय.

किती रुपये मोजले?

विक्री करण्यात आलेल्या फ्लॅटसाठी तब्बल 95 हजार रुपये स्क्वेअर फिट इतका जबरदस्त दर आकारण्यात आला होता. हा फ्लॅट 8 हजार स्क्वेअर फीटचा असल्याचं कळतंय. 8 सप्टेंबर रोजी या घराचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. तर तब्बल 9 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली.

थ्री सिक्सी वेस्ट हा एक आलीशान टॉवर आहे. याच टॉवरमध्ये एका हॉलिवूड अभिनेत्यानंही घर खरेदी केलं होतं. त्याची किंमत 55 कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली होती. 2018 साली घेतलेल्या ड्युप्लेक्ससाठी 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजून हॉलिवूड अभिनेत्याने चार वर्षांपूर्वी घर खरेदी केलं होतं. तसंच एचडीएफसीमधील एका बड्या अधिकाऱ्याने नुकतंच, वांद्रे पश्चिमेच्या आलीशान इमारतीत तब्बल 35 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचीही चर्चा आहे.

मुंबईला घर खरेदीची प्रतीक्षा

एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबई आणि ग्रेटर मुंबईत जवळपास 1.24 लाख फ्लॅट्स हे रिक्त आहेत. यांची किंमत सध्याच्या बाजारभावनुसार तब्बल 2.79 लाख कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. मात्र अद्यात या घरांना खरेदीदारांची प्रतीक्षा आहे. यापैकी 2 हजार 762 घरं ही अत्यंत आलीशान असून त्यांची किंमत प्रत्येक 10 कोटीपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय.

एकूण किंमत पाहता, या आलिशान घरांची विक्री झाल्यास रिअल इस्टेट मार्केटमध्ये तब्बल 58 हजार 807 कोटी रुपयांची घसघशीत कमाई नोंदवली जाईल. आलीशान घरांची संख्या एकूण रिक्त घरांच्या 2 टक्के जरी असली, तरी त्यांची बाजारातील एकूण किंमत 21 टक्के असल्याचं जाणकार सांगतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.