Mumbai Weather | होळीला पावसासह ‘धुळी’वंदन, मुंबईसह आसपास ‘तुफान’ वारा
मुंबईसह आसपासच्या परिसरात गेल्या 1-2 तासांपासून धुळीसह जोरदार वारा वाहत आहे. नेटकऱ्यांनी सुस्साट सुटलेल्या वाऱ्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुंबई | मुंबईकरांना पुन्हा एकदा लहरी मोसमाचं दर्शन झालंय. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही तासापासून तुफान वारा वाहत आहे. या वाऱ्यामुळे प्रचंड वेगात झाडं सैरावैरा हलत आहेत. वाऱ्याचा वेग इतका आहे की झाडं पडतात की काय, असंच वाटतंय. रस्त्यावर झांडांच्या पानांचा खच पडलाय. तर काही ठिकाणी या सुस्साट वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्याही पडल्यात. सोशल मीडियावर हा सर्व प्रकार मुंबईकरांनी कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक जण ट्विटरवर लहरी मोसमाचे व्हीडिओ आणि फोटो शेअर करत आहेत. त्यामुळे ट्विटरवर मुंबई वेदर आणि मुंबई रेन असा ट्रेंड होत आहे.
तसेच काहीत भागात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. मुंबई नजीकच्या वसई-विरारमध्ये तर पाऊसही पडला. तसेच मुंबईत मोजता येणार नाही इतक्या वेगाने वारे वाहत आहेत. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे नागरिक हवालदील झाले आहेत
मुंबईत ‘आला आला वारा’
#MumbaiWeather #MumbaiRains #shivajipark #dadar #IMD IMD Mumbai :WEATHER INFO-Nowcast warning issued at 1300 Hrs IST dated 06/03/23 : Thunderstorm accompanied with lightning and light to moderate spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph very likely to occur pic.twitter.com/NeqDSHocN0
— Shweta Verma (@shwetaa_verma) March 6, 2023
नगरमध्ये पावसाची हजेरी
नगरमध्ये वरुणराजाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात काही काळासाठी गारवा आला. पण या पावसामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं.
धुळ्यात गारपीट
तर दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात गारपीटी झालीय. अवकाळी पावसाचं नवं संकट उभं ठाकलंय. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात तब्बल तासभर गारपीट झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने भागात गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे तब्बेल एक तास इथे गारपीटचा पाऊस पडला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. दुसरीकडे नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे होळीच्या बाजारावर देखील मोठा परिणाम झालाय.