मुंबईकरांनी 11 वर्षांचा तोडला रेकॉर्ड, इतक्या कोटींच्या घरांना सर्वाधिक पसंती

Real Estate News | देशात घरांची खरेदी-विक्री तेजीत आहे. प्रॉपर्टी मार्केटला सुगीचे दिवस आले आहेत. अर्थात घराच्या, भूखंडाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पण गेल्या महिन्यात मुंबई महानगर क्षेत्रात इतक्या मालमत्तांची नोंदणी झाली की गेल्या 11 वर्षांतील रेकॉर्ड तुटला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीत मोठी गंगाजळी जमा झाली आहे.

मुंबईकरांनी 11 वर्षांचा तोडला रेकॉर्ड, इतक्या कोटींच्या घरांना सर्वाधिक पसंती
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 4:44 PM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : रिअल इस्टेटनुसार देशात मुंबई हे सर्वात महागडं शहर आहे. येथे घराचं स्वप्न सर्वात महाग आहे. घर घेण्यासाठी एकाची नाही दोघांची कमाई गाठीशी असणे आवश्यक आहे. कोरोनानंतर देशात घरांच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. पण देशाची राजधानी मुंबईवर या सर्व गोष्टींचा कुठलाच परिणाम होताना दिसत नाही. गेल्या महिन्यात या शहरात 10 हजारांहून अधिक घरांची नोंदणी झाली आहे. हा गेल्या 11 वर्षांमधील रेकॉर्ड आहे. यापूर्वीच सर्व रेकॉर्ड इतिहास जमा झाले आहेत. यामध्ये एक कोटी अथवा त्यापेक्षा अधिक किंमतींच्या घरांची पण मोठी विक्री झाली आहे.

विक्रम झाला, सरकारची कमाई पण

महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या आकड्यांनी ही बाब समोर आणली. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात मुंबईत एकूण 10,601 मालमत्तांची नोंद झाली. या मालमत्तांच्या नोंदणीमुळे सरकारच्या तिजोरीत 835.32 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या 11 वर्षांतील हे विक्रमी उत्पन्न असल्याचा दावा मुद्रांक विभागाने केला आहे. ज्या मालमत्तांची नोंदणी झाली आहे. त्यातील जवळपास 80 टक्के मालमत्ता रहिवाशी वापरासाठी तर 20 टक्के मालमत्ता या व्यावसायिक वापरासाठी नोंदणी करण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

सणासुदीत वाढली संख्या

गेल्या महिन्यात नवरात्र आणि दसरा सण झाला. त्यापूर्वी गणेश चतुर्थी होऊन गेली. या काळात घर बुकिंग करणे अनेकांनी पसंत केले. त्यामुळे एकाच महिन्यात घरांची विक्रमी बुकिंग झाली. केवळ भारतीय नागरिकांनीच नाही तर एनआरआय, अनिवासी भारतीय नागरिकांनी पण अनेक मालमत्ता खरेदी केल्या. दिवाळीच्या काळात आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महागड्या घरांची जास्त विक्री

मुंबईत यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर याकाळात एक करोड वा त्यापेक्षा अधिक किंमतीची अधिक घरांची विक्री झाली. प्रापर्टी कन्सल्टिंग फर्म नाईट फ्रँकने हा अंदाज वर्तवला आहे. या जवळपास 10 महिन्यात 1,04,832 मालमत्तांची नोंदणी झाली. त्यातील 58,706 मालमत्तांची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. 46,126 मालमत्तांची किंमत एक कोटी रुपयांहून कमी आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....