Best Chalo App | ऑनलाईन तिकीट बूकिंग ते लोकेशन ट्रेसिंग, बेस्ट बस होणार हायटेक
सकाळी सकाळी मुंबईकरांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता आपला बेस्टचा प्रवास बेस्ट आणि सुखकर होणार आहे. आता मुंबईची बेस्ट हायटेक होणार आहे. बेस्टने प्रवाशांसाठी एक खास अॅप आणि कार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे या अॅपच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवी असलेली बस ट्रॅक करू शकता.
हिरा ढाकणे, टीव्ही९ मराठी, मुंबई : सकाळी सकाळी मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता आपला बेस्टचा प्रवास बेस्ट आणि सुखकर होणार आहे. आता मुंबईची बेस्ट हायटेक होणार आहे. बेस्टने प्रवाशांसाठी एक खास अॅप (Best Chalo App) आणि कार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे या अॅपच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवी असलेली बस ट्रॅक करू शकता. यामुळे बस थांब्यावर आपल्याला हवी असलेली बस कधी येणार याचा अचूक टाईम समजेल. यामुळे आपला वेळही वाचेल.
यापेक्षाही महत्वाचे म्हणजे तिकिट खरेदी करण्यासाठी आपल्याला रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही किंवा सुट्या पैसांची कटकट नाही. आता बेस्टच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार हे मात्र निश्चित आहे. मुंबईमध्ये लोकल प्रामुख्याने प्रवासासाठी वापरली जाते. दररोज हजारोंपेक्षाही जास्त लोक लोकलने प्रवास करतात. मात्र, ज्याठिकाणी लोकल पोहचत नाही. तिथे बेस्टची बस पोहचते. चला तर जाणून घेऊयात बेस्टच्या अॅपची आणि कार्डची वैशिष्टे.
=बेस्टची अॅपची खास वैशिष्टे
1. सर्वात महत्वाचे या अॅपचे वैशिष्टे म्हणजे बस सध्या कुठे आहे आणि आपल्या बस थांब्यावर कधी येणार हे या अॅपमधून आपल्याला समजते. यामुळे आपला वेळ वाचतो आणि बस थांब्यावर ताटकळत उभे राहण्याची नाही.
2. बऱ्याच वेळा असे होते की, आपण बसची वाट वीस ते तीस मिनिटे बघतो. मात्र, प्रत्यक्षात जेंव्हा बस येते, तेंव्हा त्या बसमध्ये इतकी गर्दी असते की, आपल्याला बसमध्ये चढता देखील येत नाही. मात्र, आता या अॅपच्या मदतीने आपल्याला बसमध्ये किती गर्दी आहे हे देखील समजणार आहे.
3. या अॅपच्या मदतीने आपल्याला पास केंद्रांवर जाण्याची गरज पडणार नाहीये. मोबाईलवरून अॅपच्या मदतीने आपण बसचे तिकिट खरेदी करू शकणार आहोत. यामुळे पास केंद्रांवर जाणारा वेळ हा आपला वाचणार आहे.
4. विशेष म्हणजे या अॅपमध्ये फक्त मराठी, इंग्रजी आणि हिंदी याच भाषा नसणार आहेत. या अॅपमध्ये जवळपास 9 भाषा असणार आहेत. त्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू.
= बेस्ट चलो बस कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये
1. कोणत्याही संपर्काविना कार्ड टॅप करुन आपल्याला पैसे देता येतील. कारण तुमचे हे कार्ड कायम तुमच्याबरोबरच राहणार. मोबाईल अॅप वापरुन कोणत्याही बसमध्ये किंवा ऑनलाईन रिचार्ज करता येईल.
2. विशेष म्हणजे आपल्या पसंतीनुसार रिचार्ज करता येईल. 10 च्या पटीत 3000 रुपयांपर्यंत कितीही रकमेचा रिचार्ज करता येईल. कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही मुदतबाह्य होणार नाही.
संबंधित बातम्या :
थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पालिका, पोलीसांची करडी नजर, नवे नियम जाहीर, 6 फुटांचे अंतर बंधनकारक
Omicron : राज्यात अजून 11 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले, 825 कोरोना रुग्णांचीही नोंद