Drugs case | प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चं ड्रग्ज प्रकरणात नाव, NCBकडून समन्स
ड्रग्ज तस्करी प्रकरणात NCB कडून रोज नवं नाव समोर येत आहे. आता या प्रकरणात मुंबईच्या प्रसिद्ध मुच्छड पानवालाचंही नाव पुढे आलं आहे.
मुंबई: ड्रग्ज तस्करी प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)कडून रोज नवं नाव समोर येत आहे. आता या प्रकरणात मुंबईच्या प्रसिद्ध मुच्छड पानवालाचंही नाव समोर आलं आहे. NCBकडून मुच्छड पानवालाला समन्स बजावण्यात आलं आहे. मुच्छड पानवालाचं दुकान मुंबईतील साऊथ कॅम्प्स कॉर्नर इथं आहे. मुच्छड पानवालाचं नाव मायानगरी मुंबईमध्ये चांगलंच प्रसिद्ध आहे.(Muchhad Panwala summoned by NCB in drug case)
बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार, अनेक बडे उद्योगपती या मुच्छड पानवालाचे ग्राहक आहेत. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ याच पानवाल्याकडून नेहमी पान खातो. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी इथून पान जातं. सध्या हे दुकान उत्तर प्रदेशातील तिवारीपूरचे तिसऱ्या पिढीतील जयशंकर तिवारी चालवतात. मुच्छड पानवाला यांनी मुंबईतील नेपिएंसी रोड, मुंबई केंद्र आणि खेतवाडीमध्ये आपल्या दुकानाची शाखा सुरु केली आहे
मुच्छड पानवालाचा इतिहास
मुच्छड पानवालाचं दुकान 1977 पासून या पॉश परिसरात आहे. या दुकानाची सुरुवात श्यामचरण तिवारी यांनी केली होती. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा पानाचा व्यवसाय हा परंपरागत आहे. इथल्या पानात हर्बल प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. इथं 20 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंतचं पान मिळतं. मुच्छड पानवालाचं पान मुलांमध्येही प्रसिद्ध आहे. कारण, इथं चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पायनॅपल, व्हॅनिला अशा विविध 50 प्रकारांमध्ये पान मिळतं. जयशंकर तिवारी यांनी आपल्या वडिलांप्रमाणे ओठ्या मिश्या ठेवत हा कारभार सांभाळला आहे.
मुच्छड पानवालाची वैशिष्ट्ये
मुच्छड पानवाला यांच्याकडे तीन प्रकारच्या पानाचा वापर केला जातो. त्यात कलकत्ता, बनारसी आणि मघई पानाचा समावेश आहे. पानात वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या चटणीचा वापर केला जातो. या दुकानात अनेक प्रकारचे पान मिळतात. गोड पानाच्या प्रकारात कोलकाता स्वीट, गुंडी स्वीट, मगई स्वीट, चॉकलेट स्वीट, स्पेशल स्वीट, पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी स्वीट पानांचा समावेश आहे.
अर्जुन रामपालची बहीण NCB कार्यालयात हजर
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपाल हिला NCBकडून दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर कोमल रामपाल आज NCB कार्यालयात हजर झाली आहे. अर्जुन रामपालच्या घरात सापडलेल्या प्रतिबंधित औषधांप्रकरणात तिची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी समन्स बजावण्यात आलं तेव्हा कोमल रामपाल चौकशीही हजर झाली नव्हती.
संबंधित बातम्या:
Drugs Case | अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयातून बाहेर, तब्बल 6 तास चौकशी!
Drugs Case | चौकशीची दुसरी फेरी, गॅब्रिएला पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल!
(Muchhad Panwala summoned by NCB in drug case