Salman Khan:”सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी मुस्लिमांना लसीकरणसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे”- महापौर किशोरी पेडणेकर
मुस्लीम बहुसंख्या असणाऱ्या भागांमधील नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. यासाठी राज्य सरकारने एक नवा प्लॅन आखला आहे ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची मदत घेतली जाणार आहे.
राज्याने 10 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केलाय. मात्र राज्यात असे काही भाग आहेत जिथे वेगवेगळ्या गैरसमजांमुळे लोकं कोरोनाविरोधी लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषत: मुस्लीम बहुसंख्या असणाऱ्या भागांमधील नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. यासाठी राज्य सरकारने एक नवा प्लॅन आखला आहे ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची मदत घेतली जाणार आहे. सलमानच्या मदतीने मुस्लीम बहुसंख्या परिसरांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती केली जाणार आहे.
यावर भाष्या करतांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा लसीकरण होते तेव्हा मुस्लिमांमध्ये धार्मिक शंका असते. ज्यामूळे मुस्लीम बहुसंख्या भागांमध्ये लसीकरण दर कमी आहे. सलमान खानसारख्या अभिनेत्यानी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ते (मुस्लिम) लस घेतील अशी आशा आहे.”
Whenever vaccination happened there were religious apprehensions in Muslims, which delayed it slightly. Hoping that they (Muslims) will take jabs & actors like Salman Khan should encourage them: Mumbai Mayor Kishori Pednekar on Covid vaccines not being taken in Muslim areas pic.twitter.com/4ASKqhRjrU
— ANI (@ANI) November 17, 2021
यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी घोषणा केली होती. “राज्यातील अनेक भागात लसीकरणाचा वेग व टक्का वाढवण्यासाठी, विशेष करून मुस्लिम बहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकार अभिनेता सलमान खान याची मदत घेणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
“विशेषत: सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे. याशिवाय सलमानप्रमाणे मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अभिनेत्यांचेही लसीकरणाबाबतचे व्हिडिओ तयार केले जातील” असे राजेश टोपे म्हणाले.
इतर बातम्या-