शरद पवार, काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? नारायण राणेंनी वक्तव्यांचा पाढा वाचला

बीजीपीच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद मिळवलं. बारामतीला गेला होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला हवं, एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल बोलायला हवं. राज्याच्या अवस्थेबद्दल काही बोलत नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

शरद पवार, काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? नारायण राणेंनी वक्तव्यांचा पाढा वाचला
नारायण राणे
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 1:01 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी जुन्या वक्तव्यांचा दाखला दिला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरेंच्या शरद पवारांवरील जुन्या वक्तव्यांचा दाखला

“पवारासाहेबांना विनंती आहे धरणाच्या आतमध्ये अजित पवारांना नेऊ नका, काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणचे सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवठ्यानं अर्धवट बांधून टाकलेत, कसे पैसे गिळलेत, हे मुद्दाम जाऊन बघा. पहिल्यांदाही शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे म्हणून आपण सर्व फिरलो, मी फिरलो तेव्हा हे तिकडे कृषीमंत्री होते काय केलात तिकडे. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबके आहे.शिवसेना प्रमुखांनी गद्दारीनं कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडलं नाही. सोनिया गांधीसोबत गद्दारी करत बाहेर पडले मग नाक घासत त्यांच्याबरोबर सरकार बनवावं लागले. सोनिया गांधींनी तुमच्यावर लाथ मारली व तुम्हाला पक्षातून बाहेर काढले, सोनिया गांधींनी काढून टाकल्यावर तुम्ही पुन्हा त्यांचाकडे गेलात. शरद पवारांच्या सारखा लाचारपणा आमच्यात नाही,” असं उद्धव ठाकरे यापूर्वी म्हणाले होते, असं नारायण राणेंनी म्हटलं.

अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू, नशीब महाभारतात शरद पवार नव्हते नाही तर तिथंही फोडाफोडी केली असती. शरद पवार म्हणजे लुडबुडे ज्योतिषी, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांचा उल्लेख नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला

बीजीपीच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद मिळवलं. बारामतीला गेला होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला हवं, एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल बोलायला हवं. राज्याच्या अवस्थेबद्दल काही बोलत नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

शिवसेनेचे 56 आमदार नरेंद्र मोदींमुळे

कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं. आम्ही दिल्ली काबीज करणार. लिखाण करताना त्यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं, असं राणे म्हणाले. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं राहणार नाही जागेवर डोक्याविना संजय राऊत दिसतील, असा टोला नारायण राणे यांनी केली. भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे. मात्र, आता 56 आमदार आहात. ते मोदींमुळेच निवडून आला आहात. नाही तर आठच्यावर जाणार नाही. मोदींची मेहरबानी आहे. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

इतर बातम्या:

दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane read Uddhav Thackerays statements on NCP Chief Sharad Pawar and Congress before MVA Government

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.